आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सदानंद कदमांना अनिल परबांना फसवले':आत टाकायचे तर अनिल परबांना टाका - रामदास कदम; परबांना खेड कोर्टाचा मोठा दिलासा

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''दापोलीतील साई रिसाॅर्ट प्रकरणी आत टाकायचे असते तर अनिल परबांना टाका. सदानंद कदमांचा काय संबंध? असा सवाल करून अनिल परबांनी सदानंद कदमांना फसवल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. तर याच प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अनिल परबांना खेड न्यायालयाचा मोठा दिलासा दिला आहे.

काय म्हणाले रामदास कदम?

रामदास कदम म्हणाले, आतमध्येच टाकायचे असते तर मी सदानंद कदमांना नव्हे तर अनिल परब यांना आत टाका असे म्हटले असते. सदानंद कदम यांचा काय संबंध येतो. मी आधीच सांगितले आहे. सदानंद कदमांना अनिल परब यांनी फसवले. माझ्या माहितीनुसार लाईटचे बील अनिल परब यांच्या नावावर आहे.

परबांनी बळीचा बकरा बनवला

रामदास कदम म्हणाले, सदानंद कदम यांना अनिल परब यांनी बळीचा बकरा बनवला. म्हणून सदानंद कदम यांचाकाहीही संबंध नसेल,. ते निश्चितच बाहेर पडतील. या प्रकरणात सखोल चौकशी अनिल परबांचीच व्हावी ही माझी मागणी आहे.

जयराम देशपांडे इडीच्या ताब्यात

दापोली रिसाॅर्टप्रकरणी सदानंद कदम हे इडीच्या कोठडीत आहेत. तर इडीच्या अधिकाऱ्यांनी जयराम देशपांडे यांना ताब्यात घेतले आहे. इडीचे अधिकारी जयराम देशपांडे यांना घेऊन इडी कार्यालयात नेत आहेत.

अनिल परबांना मोठा दिलासा

अनिल परबांना मोठा दिलासा मिळाला असून केंद्र सरकारने दाखल केलेला पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल गुन्हा रद्द करण्यात आला आहे. खेड न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. याबाबत अनिल परब म्हणाले, दापोली रिसाॅर्टबाबत मी वेळोवेळी भूमिका व्यक्त केली होती. या रिसाॅर्टशी माझा काहीच संबंध नाही.

आता हे प्रकरण निकाली निघाले

अनिल परब म्हणाले, प्रदुषण नियामक मंडळ, पोलिस, कलेक्टर असतील या सर्वांनी रिपोर्ट दिला होता की, रिसाॅर्टचे पाणी समुद्रात जात नाही. खेड कोर्टामध्ये हे प्रकरण निकाली निघाले. खेड कोर्टाने ही प्रक्रिया रद्द केली असून हायकोर्टाने मला सोमवारपर्यंत संरक्षण दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...