आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझ्या 52 वर्षांच्या राजकारणात 2022 मी कधीच विसरणार नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत 2022 मध्ये उभी फूट पडली. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला. त्यांच्यासोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी आपल्या बापाच्या विचारांशी गद्दारी केली, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.
शिवसेनेत फुट पडून शिंदे गटाची निर्मिती झाल्यानंतर रामदास कदम यांनी ठाकरे गटातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते शिंदे गटात सामिल झाले आहेत. तेव्हापासून रामदास कदम सातत्याने ठाकरे कुटुंबावर आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांवर टीकेची तोफ डागत आहे.
मराठी माणसाशी गद्दारी केली
पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली. जसे जयंत पाटील हिवाळी अधिवेशनात गुपचूपपणे म्हटले की, आताची शिवसेना ही राष्ट्रवादीची आहे. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरेंनी शिवसेना शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधली. मराठी माणसाशी त्यांनी गद्दारी केली. पक्ष फुटला तरी चालेल, मराठी माणूस संपला तरी चालेल मात्र शरद पवार यांच्या पाठीशी ठामपमे उभे राहिले पाहिजे असी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. ही भूमिका बाळासाहेबांच्या विचारांशी विसंगती आहे.
नैतिकतेची भाषा शोभत नाही
अजित पवारांवर टीका करताना रामदास कदम म्हणाले, जो नवाब मलिक दाऊदशी संबंधित आहे. त्याला पाठिंबा देणाऱ्या अजित पवारांना शिंदे गटाविषयी बोलण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांचे उपमुख्यमंत्रीपद गेल्याने त्यांची तडफड सुरु आहे. नैतिकतेची भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही.
परब यांची जागा जेलमध्येच
माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, अनिल परब यांची ईडी चौकशी झालीच पाहिजे. अनिल परब यांची जागा जेलमध्येच आहे. उद्धवजींना चुकीचे सल्ले देणाऱ्यांमध्ये अनिल परब यांचेच नाव येते. आमची बांधिलकी बाळासाहेबांच्या विचारांशी आहे. त्यामुळे अनिल परब यांच्यासारखी बेईमानी आम्ही करु शकत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.