आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Rana Couple Issue : Evidence Of Unauthorized Construction Found By BMC In The House Of Navneet Rana During Investigation, Notice Of Action May Be Issued Today

राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या:BMC च्या तपासणीत घरात आढळले अनधिकृत बांधकाम, आज कारवाईची नोटीस देण्याची शक्यता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक आणि नंतर जामिनावर सुटलेल्या राणा दाम्पत्याच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. बेकायदा बांधकामाच्या संशयावरून तपासणीसाठी आलेल्या मुंबई महापालिकेच्या पथकाला त्यांच्या खार येथील घरात अनेक अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत. त्यामुळे आज नवनीत राणा आणि रवी राणा यांना या बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भात नोटिसा पाठवली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तत्पूर्वी, अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. आज ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊ शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या तपासणीनंतर बीएमसीच्या अधिकाऱ्याने मीडियाशी बोलताना सांगितले की, आजची चौकशी झाली आहे, आता आम्ही आमचा अहवाल देऊ, त्यानंतरच काय कारवाई करायची आहे याविषयी काही निर्णय घेतला जाईल.

मुंबई पोलिस पुन्हा नोटीस देऊ शकतात
हनुमान चालीसा वादात मुंबई पोलिस आज पुन्हा राणा दाम्पत्याला चौकशीसाठी नोटीस देऊ शकतात. मात्र, दोघेही दिल्लीत आहेत. सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला होता. राणा दाम्पत्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असता त्यांना पोलिस ठाण्यात हजर राहावे लागेल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. पोलिसांना राणा दाम्पत्याला चौकशीसाठी बोलावायचे असेल तर त्यांना 24 तासांची नोटीस द्यावी लागेल.

फोटोंवरून सुरु आहे वाद
तुरुंगातून सुटल्यानंतर नवनीत राणा यांना थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान त्यांच्यावर एमआरआय चाचणीसह अनेक चाचण्या करण्यात आल्या. या चाचणीदरम्यान कोणीतरी त्याचे फोटो क्लिक केले. आता त्या फोटोंमुळे वाद निर्माण होत आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी लीलावती रूग्णालयाला प्रश्न विचारला आहे की, नियमानुसार रूग्णालयाच्या आतील एमआरआय रुममध्ये कोणत्याही प्रकारचे फोटो काढण्यास आणि धातूच्या वस्तू नेण्यास बंदी असताना तेथे मोबाईल घेऊन कोण गेले?

नवनीत राणा संजय राऊतांविरोधात एफआयआर दाखल करणार
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मी एफआयआर दाखल करणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. 23 मे रोजी, नवनीत राणा विशेषाधिकार समितीसमोर लेखी तक्रार करतील आणि वैयक्तिकरित्या उपस्थित राहून प्रकरणाची नोंद करतील.

लोकसभा अध्यक्षांकडेही केली तक्रार
तत्पूर्वी, लोकसभा अध्यक्षांशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी ओम बिर्ला यांना त्यांच्या अटकेपासून ते पोलिस ठाण्यात त्यांच्याशी केलेल्या वागणुकीपर्यंतच्या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती दिली आहे.

या बैठकीनंतर नवनीत राणा म्हणाल्या की, आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पूर्ण पालन केले आहे, मात्र मी माझ्या हक्कासाठी लढणार आहे. मी दिल्ली पोलिसांकडे तक्रार करणार आहे. त्या म्हणाल्या की, जे लोक खासदारांना खुलेआम धमक्या देतात, ते सर्वसामान्य लोकांसाठी काय करतील? आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करणार आहोत की, अशा लोकांवर कारवाई करावी.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण
राणा दाम्पत्याला 4 मे रोजी मुंबईतील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने जामीनाबाबत अटीही घातल्या आहेत. त्यात न्यायालयाने जामीनादरम्यान असा गुन्हा पुन्हा करू नये, माध्यमांशी बोलू नये, असे म्हटले आहे. त्याचवेळी राणा दाम्पत्याने म्हटले आहे की, त्यांनी मीडियाशी बोलताना न्यायालयाचा अवमान केलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...