आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणा दाम्पत्याने आदेशाचे उल्लघन केले:जामीन रद्द झालाच! आता ताब्यात घेण्याच्या प्रक्रीयेसाठी न्यायालयाकडे विनंती करणार -सरकारी वकील घरत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राणा दाम्पत्यानी न्यायालयाच्या अटींचा भंग केला आहेच; त्यामुळे जवळपास त्यांचा जामीन आपोआपच रद्दच झाला. आता त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रीया राबवावी अशी विनंतीही आम्ही न्यायालयाला करणार आहोत असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी स्पष्ट केले.

सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, ''पंतप्रधान आणि अमित शाह यांना भेटून राज्य सरकारची तक्रार करणार आहोत. आम्हाला जी वागणूक दिली यासाठी महाराष्ट्राची जनता ठाकरे सरकारला माफ करणार नाही'' अशा शब्दात राणा दाम्पत्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केले हे उघड असून त्यांना परत ताब्यात घेतले जावे यासाठी आम्ही न्यायलायाकडे विनंती करणार आहोत असे घरत म्हणाले.

आम्ही अटींचे उल्लंघन केलेच नाही - रवी राणा

न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केल्याबाबत माध्यमांनी राणा दाम्पत्यांना विचारले असता आमदार रवी राणा म्हणाले की, ''सरकारच्या विरोधात आम्ही बोललो. सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही आवाज काढत आहोत ,संविधानाने हा अधिकार मला दिला आहे, त्यामुळे आम्ही न्यायालयाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केले नसल्याचे राणा यांनी स्पष्ट केले. ''

राणा यांच्या तक्रारीवर 23 मे रोजी सुनावणी

राणा दाम्पत्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राज्य सरकारची तक्रार केली होती. यानंतर राज्य सरकारनेही राणा दाम्पत्यांची तक्रार केली होती. या प्रकरणात आता संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर सुनावणी होणार आहे.

मुख्यमंत्र्यांवर टीका, फडणवीस, अजित पवारांचे कौतूक

मुख्यमंत्री पाठीत खंजिर खुपसणारे आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतानाच नवनीत राणा यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी कौतूक केले. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकायला हवे असा टोलाही त्यांनी लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरणीय दादा अशी बिरुदावली नवनीत राणा यांनी व्यक्त केली. तसेच अजित पवार उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त कामे करतात अशा शब्दातही नवनीत राणा यांनी अजित पवारांचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...