आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग लागल्याशिवाय धूर निघत नाही:जशी करणी, तशी भरणी; ते महाविकास आघाडीचे एजंट- राणा दाम्पत्याची राऊतांवर टीका

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरावे नसल्याशिवाय ईडी कुणावरही कारवाई करत नाही. आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. खरे तर संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईला उशीर झाला आहे, असे म्हणत पक्ष खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे पथक रविवारी (31 जुलै) सकाळी 7 वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, जर ते ऐवढे स्वच्छ चरित्राचे आहे. तर मग त्यांनी आतापर्यंत ईडीला का स्टेटमेंट दिले नाही, वेळ का मागितला. प्रत्येकवेळी विविध कारणे देत पुढची वेळ का मागितली, असा सवाल त्यांनी केला. ते भष्ट्राचारी आहे, म्हणून चौकशी सुरू आहे.

संजय राऊत महाविकास आघाडीचे एजंट बनले होते. त्यांनी एक साधा पत्रकार म्हणून सुरवात केली. मग आता ऐवढे पैसे कोठून आणले, असा सवाल राणा यांनी केला. तसेच मग आशा व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे की नाही, असा सवालही त्यांनी केला.

याशिवाय, रवी राणा यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, संजय राऊतांची यापूर्वीही अनेकदा चौकशी झाली. त्यांची अनेक ठिकाणी संपत्ती आहे. महाराष्ट्र सरकार जरी त्यांना वाचवत असेल तरी ईडीकडून आज त्यांच्यावर कारवाई केली जाईल. संजय राऊत यांचा घडा भरला असून जशी करणी तशी भरणी अशी परिस्थिती संजय राऊत यांची झाली आहे. यात कोणताही राजकीय संबंध नाही. बेकायदेशीर संपत्ती जमा करणाऱ्यावरच ईडी कारवाई करते. संजय राऊत यांची कोणकोणत्या बिल्डरांशी भागिदारी आहे, याचे पुरावे मीडियाला देणार आहे.

काय आहे पत्राचाळ प्रकरण?

  • गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू, फ्लॅट विकण्याचा नावाखाली 138 कोटी जमा केले
  • म्हाडाच्या इंजीनिअरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून चौकशी
  • एकूण 1039.79 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय
  • 100 कोटी रुपये प्रवीण राऊतांच्या अकाउंटवर ट्रान्सफर
  • प्रवीण राऊत यांनी ही रक्कम जवळचे मित्र आणि नातेवाईकांना हस्तांतरित केली
  • 55 लाख रुपये वर्षा संजय राऊत यांना दिल्याचे समोर
बातम्या आणखी आहेत...