आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेवर टीकास्त्र:राणे, राणा आणि राज विरोधकांनी RRR जमा केले; अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे टीकास्त्र

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यासत आला आहे. 1 मेच्या सभेत राज ठाकरेंनी पोलिसांनी दिलेल्या 12 अटींचे उल्लंघन केल्याचा पोलिसांनी म्हटले आहे. यावर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी राज ठाकरेंवरील कारवाई ही कायदेशीर आहे. असे म्हणत त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा योग्य आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधकांनी राणे, राणा, आणि राज असे RRR जमवले आहे, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

कायद्यापेक्षा कुणी मोठे नसते - छगन भुजबळ

कायद्याचे जो कोणी उल्लघन करतो, त्याला परिणाम माहिती असतात. त्यामुळे आपण काय करावे काय नाही, हे ज्याने त्यांने ठरवायला हवे, असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. कारण कायद्यापेक्षा कुणी मोठे नाही, असे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तर विरोधकांनी सरकारविरोधात RRR राणे, राणा आणि राज जमवले आहेत असा टोला भुजबळांनी लगावला आहे. तसेच आंदोलन करण्यावर ठाम असाल तर पोलिसही त्यांचे काम करतील. पोलिसांनी नियमाप्रमाणे नोटीस दिल्या आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था ठेवणे हे पोलिसांचे काम आहे, असेही भुजबळांनी म्हटले आहे.

केवळ मुख्यमंत्र्यांच्या शब्द चालणार, अल्टिमेटम नाही

राज ठाकरेंवर गुन्हा झाल्याच्या मुद्द्यावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, अशा प्रक्षोभक भाषणांविरुद्ध गुन्हे दाखल होतच असतात. त्यात नवं असं काहीच नाही. असे गुन्हे रोजच दाखल होत असतात. आमच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. सामनाच्या अग्रलेखावरून अनेक गुन्हे दाखल होतात. राज्याच्या बाहेरून काही गुंड प्रवृत्तीचे लोक आणायचे आणि गडबड करायची, मुंबई आणि राज्याचे पोलिस सक्षम आहेत. मुख्यमंत्र्यांच लक्ष आहे सर्व परिस्थितीवर.

अल्टिमेटमवर राज्य चालत नाही. या इथल्या यंत्रणा सक्षम आहेत. नेतृत्व सक्षम आहे. हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर ते सर्वात मोठी चूक करत आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गेले होता, या प्रश्नावर ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे अनेक बैठका सुरू असतात. शासकीय विषय असतात. त्या गोष्टी बाहेर बोलणार नाही.

नियमांचे उल्लंघन केले तर गुन्हा दाखल होणारच - नाना पटोले
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. या नियमांच्या पलीकडे कुणी जात असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल होणारच असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षांपासून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंधन दरवाढ, महागाई अशा मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्यासाठी भाजपच्या इशाऱ्यावर काही जण काम करत आहे.

जनतेच्याही हे आता लक्षात आले आहे. ही अस्थिरता, अराजकता थांबवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासंदर्भात प्रशासनाने योग्य ती पावले तातडीने उचलावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे नाना पटोले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...