आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:‘रंगीला गर्ल’ ऊर्मिला हाती घेणार शिवसेनेचा भगवा, आठवडाभरात पक्षप्रवेशाची शक्यता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस पक्ष अवघ्या सहा महिन्यांत सोडलेली बॉलीवूडची प्रसिद्धी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरने शिवसेनेचा भगवा हाती घेण्याचा निश्चय केला आहे. या आठवड्यात ऊर्मिलाचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश होत आहे.

४५ वर्षीय ऊर्मिलाने सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मध्य मुंबईतून तिने लोकसभा लढवली. मात्र तिचा पराभव झाला होता. त्यानंतर मुंबई काँग्रेसमधील हेव्यादाव्यास वैतागून तिने सहा महिन्यांत काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त म्हणून ऊर्मिलाची शिवसेनेने मागच्या महिन्यात शिफारस केली आहे. मात्र, राज्यपाल यांनी अद्याप या यादीस संमती दिलेली नाही. तत्पूर्वी ऊर्मिलाने शिवसेनेचा भगवा हाती घेण्यास होकार दिला आहे. रविवारपर्यंत ऊर्मिलाचा सेनेत प्रवेश होईल, अशी माहिती एका सेना नेत्याने ‘दिव्य मराठी’स दिली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser