आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौफ्यस्फोट:महाविकास आघाडीचे 25 आमदार संपर्कात, निवडणूक लागताच भाजपमध्ये येतील, रावसाहेब दानवेंचा दावा

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते विधानसभेच्या अधिवेशनावरच बहिष्कार टाकणार होते पण नंतर ते सावरले. आगामी विधानसभा निवडणुका लागताच ते भाजपमध्ये येतील असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केला.

रावसाहेब दानवे यांनी एबीपी माझाशी बोलताना शिवसेनेवरही टीका केली. ते म्हणाले, “ज्या दिवशी शिवसेनेने आम्हाला सोडले व काँग्रेस, राष्ट्रवादीला जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. आता त्यांनी हिरवे पांघरून घेतले, ते हिरव्याचे समर्थन करतात. फक्त उरलेली इज्जत वाचवण्यासाठी सध्या ते भगवा-भगवा करीत असतात. त्यामुळे भेसळ आमच्यात आहे की त्यांच्यात हे त्यांनी तपासून पाहावे.

दोन-तीन एकत्र आले की भेसळ

भेसळ एकट्याची होत नसते, तर दोन-तीन एकत्र आले की ती भेसळ ठरते. अशी खरपूस टीका दानवेंनी केली. आम्ही कधीच कोणाच्या पाठीत वार केला नाही. यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी युती तोडली. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिली नाही. शिवसेना उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांची झाली असा टोलाही त्यांना लगावला.

भाजप समोरून वार करते

शिवसेनेने दगाफटका केला. भाजप कधीही समोरून वार करते, मागून नाही असे सांगत महाविकास आघाडी सरकार खड्डे खांदत असल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, ज्याचा मृत्यू आला ते खड्ड्यात जाईल. महाविकास आघाडीचा मृत्यू जवळ आल्याची टीकाही त्यांनी केली.

रावसाहेब दानवे म्हणाले, पुढील २५ वर्षे भाजपचे सरकार टिकणार आहे. प्रथमदर्शनी आमच्या राज्यातील नेत्याविरुद्ध चाललेला प्रकार हा कट कारस्थानाचा आहे असे दिसते. पेनड्राईव्ह प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हायला हवी. दोषींना शिक्षा व्हायलाच हवी.

काँग्रेस प्रादेशिक पक्ष

काँग्रेसच्या स्थितीबद्दल ते म्हणाले, काँग्रेसवाले बदलू शकत नाही. सोनिया गांधी, राहुल, प्रियंका गांधींकडे पक्षाचे नैतृत्व दिले, पण उपयोग झाला नाही. काँग्रेसकडे उत्तर प्रदेशातील ४०३ जागांपैकी ३०० च्यावर जागा होत्या आता मात्र त्यांच्या वाट्याला जागा मिळणे म्हणजे काँग्रेसची अवस्था प्रादेशिक पक्ष म्हणुनही राहिला नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...