आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण:दानवेंच्या विरोधात उदयनराजेंचे कार्यकर्ते आक्रमक; टायर पेटवून रस्ता केला बंद

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या विरोधात साताऱ्यात खासदार उदसयनराजे भोसले यांचे कायकर्ते आक्रमक झाले आहेत. दानवेंनी केलेल्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत टायर पेटवून रस्ता केला बंद करत निषेध व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हायवेवर पेटवलेले टायर बाजूला करत रस्ता मोकळा केला. तर कालच काही शिवप्रेमींनी साताऱ्यात रावसाहेब दानवेंच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी त्यांनी शिवप्रेमी दानवेंविरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते, त्यांनी दानवेंविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. ​​​​​​

शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा:केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे स्पष्टीकरण, म्हणाले - पुन्हा एकदा माफी मागतो
वाचा सविस्तर

काय म्हणाले दानवे?

रावसाहेब दानवे म्हणाले, ''मला असे वाटते की, हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीवर केले याची एकदा चौकशी व्हावी. हे वक्तव्य वादग्रस्त होऊ शकते की, नाही हे तपासण्याची गरज आहे. मी सुद्धा शिवरायांचा प्रेमी आहे. शिवरायांबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य कुणी करू नये. शिवरायांचा अवमान करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे का? याचा सर्व समाजाने विचार करायला हवा. (या वाक्यात दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला.

रावसाहेब दानवे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आपली भूमिका दानवे सांगत होते त्यावेळी त्यांच्याकडून एकेरी उल्लेख झाला. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

अनावधानाने उल्लेख केला

रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे की, काही माध्यमांनी मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना एकेरी भाषेचा वापर केला, असे वृत्त दिले आहे. मात्र या दोन वर्षांमध्ये मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दोन वर्षांपूर्वी मी नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी तेथील पत्रकारांनी मला राज्यपालांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी मी अनावधानाने शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला. तेव्हा माझ्यावर टीकेची झोड उठली होती. मी तेव्हा समस्त देशवासीयांची माफी मागितली होती. तो व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे.

बातम्या आणखी आहेत...