आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाव्यांची धुळवड:धुळवडीला कोणते भजे खाऊन रावसाहेब दानवेंनी 25 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला? अब्दुल सत्तार यांनी उडविली दानवेंची टर

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. हा दावा शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी खोडून काढला. दानवेंनी धुळवडीच्या दिवशी कोणते भजे खाऊन हा दावा केला केला अशा शब्दात दानवेंची सत्तार यांनी टर उडविली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा धुळवडीच्या दिवशी केला. या दिवशी खासकरून भांगाचे भजे खाल्ले जातात. भांगयुक्त भजे खाल्ल्याने नशाही येते. त्याच धर्तीवर दानवे यांची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी टर उडविली.

ते म्हणाले की, धुळवडीच्या दिवशी दानवेंनी कुठले भजे खाल्ले त्यांनाच माहित, पण आमचे नाही, तर भाजपचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत, ते पळू नये म्हणून दानवेंकडून अशी दिशाभूल केल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे.

भाजपचे नेते महाविकास आघाडीचे 25 आमदार फुटणार असा दावा, करीत आहेत. तर शिवसेनेने भाजपचेच आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यावरून दोन्ही पक्षात धुळवड सुरू असताना अब्दुल सत्तार यांनी दानवेंचा दावा खोडून काढला आहे.

माध्यमांशी बोलताना सत्तार म्हणाले, काल धुळवड होती, रावसाहेब दानवेंनी कशाचे भजे खाल्ले माहित नाही, त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीचे २५ आमदार आमच्यासोबत असल्याचे सांगत आहेत. उलट राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे, ते पडत नाही हे लक्षात आल्यानंतर अशी विधाने मुद्दामहुन केली जात आहेत.

एमआयएमबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतील

रावसाहेब दानवे 25 आमदार संपर्कात असल्याचे असे वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करीत आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या भेटीत महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिला. मात्र महाविकास आघाडीत कोणाला घ्यायेचे, कुणाला नाही याचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहेत. ते जे ठरवतील तोच निर्णय अंतिम राहील असेही ते म्हणाले.

टोपे शब्द देऊ शकत नाही

राजेश टोपे यांनी इम्तियाज जलील यांना काय आश्वासन दिले, हे मला माहित नाही. पण तो त्यांचा वैयक्तिक विषय असु शकतो. महाविकास आघाडी म्हणून टोपेंनी त्यांना काही शब्द देईल असे वाटत नाही, कारण या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नाही तो उद्धव ठाकरे यांना आहे, असेही सत्तार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...