आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावसाहेब दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख:साताऱ्यात दानवेंच्या पुतळ्याचे दहन, मिटकरी म्हणाले- भाजप नेत्यांना टकमक तोफावरून ढकला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आपली भूमिका व्यक्त केली. त्याचा एक व्हिडीओही समोर आला असून यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख त्यांच्याकडून झाला आहे. हा व्हिडीओ सोशल माध्यमात व्हायरल होत असल्याचे बोलले जात आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे.

काय म्हणाले दानवे?

रावसाहेब दानवे म्हणाले, ''मला असे वाटते की, हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीवर केले याची एकदा चौकशी व्हावी. हे वक्तव्य वादग्रस्त होऊ शकते की, नाही हे तपासण्याची गरज आहे. मी सुद्धा शिवरायांचा प्रेमी आहे. शिवरायांबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य कुणी करू नये. शिवरायांचा अवमान करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे का? याचा सर्व समाजाने विचार करायला हवा. (या वाक्यात दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला.)

रावसाहेब दानवे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आपली भूमिका दानवे सांगत होते त्यावेळी त्यांच्याकडून एकेरी उल्लेख झाला. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

शेण खाण्याची परंपरा - आमदार मिटकरी

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावरून आता नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मि​​​​​​टकरी म्हणाले, भाजपने एक परंपरा शेण खाण्याची परंपरा सुरू केली. जिथे दिसतील तिथे मारायला हवे. भाजपच्या नेत्यांना टकमक तोफावरुन ढकलायला हवे. सात दिवसांपासून त्यांच्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य येत आहेत.

साताऱ्यात दानवेंच्या पुतळ्याचे दहन करताना शिवप्रेमी कार्यकर्ते.
साताऱ्यात दानवेंच्या पुतळ्याचे दहन करताना शिवप्रेमी कार्यकर्ते.

दानवेंविरोधात आंदोलन

साताऱ्यात रावसाहेब दानवेंनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी आक्र्मक झाले होते. त्यांनी दानवेंविरोधात घोषणाबाजीही दिली.

राज्यपालांचे ते वादग्रस्त वक्तव्य

1) महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही," असेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

2) चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचे आपल्या समाजात मोठे स्थान असते, तसेच छत्रपतींनी मला माझे राज्य तुमच्या कृपेने मिळाले आहे, असे समर्थांना म्हटले. असे वक्तव्य कोश्यारींनी केले होते. या वादावर स्पष्टीकरणही त्यांनी दिले होते.

3) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. जेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचे लग्न झाले तेव्हा ते 13 आणि 10 वर्षांचे होते. त्या वयात मुलगा मुलगी काय करतात.

मंगल प्रभात लोढांचे ते वक्तव्य

औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये किल्ल्यात बंद करुन ठेवले होते. त्यावेळी शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी जसे तिथून बाहेर आले, तसे एकनाथ शिंदेंना बाहेर पडू न देण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर आले असे म्हणत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायाच्श आग्र्यातील सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंच्या बंडाशी केली.

बातम्या आणखी आहेत...