आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:लग्नाचे आश्वासन देत अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप, एका कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपीने अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी तिच्याकडून पैसे घेतल्याचा अभिनेत्रीचा आरोप

सांताक्रूज परिसरात अभिनेत्रीला लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका कंत्राटदाराविरोधात दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी सुदीप कुमार शाह नावाच्या एका व्यक्तीविरोधीत गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या तक्रारी अभिनेत्रीने म्हटले की, ती ओशीवारा भागात राहते आणि 2016 पासून कुमार शाहला ओळखते. शाहने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. दोघांत शारिरीक संबंध देखील बनले. मात्र शाह आधीपासून विवाहित असल्याचे पीडितेला समजले. 

अभिनेत्रींकडून घर खरेदी करण्यासाठी आरोपीने पैसेही घेतले

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी सुदीप शाहने एक अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी तिच्याकडून उसने पैसे घेतल्याचे अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपी सुदीप कुमार शाह विरोधात भादंवि कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही.