आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉन्सर्ट वादात:रॅपर एपी ढिल्लनच्या कॉन्सर्टमध्ये कोरोना नियम धाब्यावर, पोलिसात तक्रार; जान्हवी कपूर आणि सारासह इब्राहिमचीही उपस्थिती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट म्हणजेच ओमायक्रॉनचा धोका वाढलेला आहे. संपूर्ण देशाच्या दुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त संक्रमित रुग्ण आहेत. असे असुन देखील नामांकित लोक नियम तोडत असताना दिसत आहेत. यामध्ये ताजे नाव आहे सिंगर आणि रॅपर एपी ढिल्लनचे. त्यांच्यावर आरोप आहे की, मुंबईमध्ये कलम 144 असताना देखील त्यांनी एक कॉन्सर्ट केली आणि यामध्ये शेकडो लोक विना मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग न पाळता सामिल झाले.

कॉन्सर्टमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कॉन्सर्टच्या आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. विशेष म्हणजे ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात मनाई आदेश लागू करून प्रत्येक सार्वजनिक रॅली, कार्यक्रम आणि धरणे यांना बंदी घातली होती. मात्र, सर्व नियम पाळून ही कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

यात अनेक बड्या सेलिब्रिटींचा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित या कॉन्सर्टमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचाही सहभाग होता. दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर आणि इब्राहिम अली खान यांनीही याच कॉन्सर्टमध्ये हजेरी लावल्याचे फोटोज सोशल मीडियावर समोर आले आहे.

59 देशांमध्ये ओमिक्रॉनची प्रकरणे आढळली
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. लव अग्रवाल म्हणाले की, जगभरातील 59 देशांमध्ये ओमायक्रॉनची प्रकरणे आढळून आली आहेत. ICMR अधिकाऱ्याने सांगितले की वैद्यकीयदृष्ट्या, ओमायक्रॉनने अद्याप आरोग्य यंत्रणेवर भार टाकलेला नाही, परंतु दक्षता राखणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात 17 जणांना या प्रकाराची लागण झाली असून त्यापैकी 8 जण आतापर्यंत बरे झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...