आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोरच्या अडचणी वाढल्या असून, सरकार राहणार की जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आता शिवसेनेचा मोर्चा हातात घेतला आहे. रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून समजवण्याचा प्रयत्न केला आहे.
बंडखोर आमदारांना समजवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांकडून केला गेला. मात्र, त्याचा काहाही उपयोग झाला नाही. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील सर्व बंडखोरांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यांचेही ऐकेनासे झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे त्या बंडखोरांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांशी मॅसेज करून चर्चा केली होती. बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे की, ते सध्या शिवसेनेतच आहेत. बंडखोर आमदार आपण शिवसेनेसोबत असल्याचे सांगत आहेत मात्र, ते गुवाहटीतून मुंबईत यायला तयार नाहीत. त्यामुळे शिवसेनेत सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून त्यांना समजवण्याचे सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी काही आमदारांना गुवाहटीतून परत मुंबईत आणणार असा विश्वास व्यक्त केला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी 16 आमदारांना कारवाईची नोटीस बजावली आहे.
बंडखोरांचा संख्याबळाचा दावा
राज्यात शिवसेने विरुद्ध शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटाने कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाने असा दावा केला आहे की, आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांना 38 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपाल कोश्यारी आणि झिरवाळ यांना पाठवले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.