आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दीसाठी रश्मी ठाकरे मुंबईतील महिलांना घेऊन जात आहेत, म्हात्रेंचा टोला:आईवर टीका करण्याची त्यांची संस्कृती, आदित्य ठाकरेंचे उत्तर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिल्यांदा रश्मी वहिनी ठाण्याला जात आहेत. त्यासाठी गर्दी जमवण्यासाठी मुंबईवरुन महिलांना जमा करुन नेले जात आहे, अशाप्रकारची टीका शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंनी थेट रश्मी ठाकरेंवर केली आहे. आईवर टीका करण्याची त्यांची संस्कृती असल्याचे प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी त्यांना दिले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे नवरात्रीनिमित्त ठाणे येथील टेंभीनाक्याच्या दर्शनासाठी जात आहेत. रश्मी ठाकरे यांच्यांकडून येथील देवीची आरती होणार आहे तर शिंदे गटाकडून आरतीसाठी वेळ राखून ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि शिंदे गटात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकांचा कल शिंदेंकडे

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी रश्मी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, महिला कमी पडत आहेत तर गर्दी जमवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. असा प्रकार शिवसेनेत घडायला नको होता. कारण गर्दी आणि शिवसेनेमध्ये अंतर पडत असेल तर शिल्लकसेनेने हे समजून घ्यावे की लोकांचा कल नक्की कोणाकडे आहे. तर यातून हे स्पष्ट होते की लोकांचा कल आज शिंदेंकडे आहे. मुंबईतल्या महिला रश्मी वहिंनीसोबत ठाण्याला जात आहे. यातच सर्व काही आले.

म्हात्रेंचे ट्विट

याबाबत म्हात्रे यांनी ट्विटही केले आहे. ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, 'अरेरे..रश्मी वहिनी ठाण्याला जाणार आहेत. म्हणून शिल्लक सेनेला असे msgs करुन मुंबई मधून महिला गोळा करुन गर्दी दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे...'

आईवर टीका आदित्य संतप्त

युवासेनाप्रमुख तसेच रश्मी ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी शितल म्हात्रेंनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ते आईवर टीका करु शकतात. ती त्यांची संस्कृती आहे. आणि त्यांच्यामधील गद्दारांनी ते याआधी दाखवून दिले आहे. आम्ही सगळे दर्शनासाठी जात आहोत. कुठेही राजकीय हेतू नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.

आनंद दिघेंनी सुरु केलेला उत्सव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यात देखील ठाण्याच्या नवरात्र उत्सवावरुन वाद झाला होता. या वादामुळे आधीच टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव यंदा अधिक चर्चेत आहे. तर आता खुद्द रश्मी ठाकरे याठिकाणी येणार असल्याने वाद वाढण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे. शिंदे यांचे गुरु आनंद दिघेंनी हा उत्सव सुरु केला होता.

बातम्या आणखी आहेत...