आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन दुकानातून वायफाय मिळणार!:सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात वायफाय क्रांती करण्यासाठी केंद्र सरकार, दूरसंचार विभाग आणि संचार मंत्रालय यांनी “पीए-वाणी’ योजना महाराष्ट्रातील सात जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. स्वस्त धान्य दुकानात (रेशन दुकान) राऊटर बसवून गावाला स्वस्तात वाय फाय सुविधा पुरवण्यात येणार आहे. त्यातून स्वस्त धान्य दुकानदारांना उत्पन्न मिळणार आहे.

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, पालघर आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यात २०२२ मध्ये हा प्रकल्प सुरू होईल. रेशन दुकानात एक राऊटर बसवण्यात येईल. रेशन दुकान हे इंटरनेटचे डेटा सेंटर असेल. दुकानाच्या परिघात २०० मीटर पर्यंतच्या नागरिकांना अत्यल्प दरात वायफाय सुविधा प्राप्त होणार आहे. देशातील शहरी भागात जितकी इंटरनेटची सुविधा आहे, त्या तुलनेत ग्रामीण भागात एक तृतीयांश इतकी मर्यादित आहे. त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आली आहे. रेशन दुकानदारांनी यासंदर्भातील नोंदणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे करायची आहे. २०२० पासून यूपी, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशात सुविधाडेटा सेंटर म्हणून कार्य करणाऱ्या रेशन दुकानांना यातील उत्पन्न दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...