आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षा राउत यांना कोरोना:संजय राउत यांच्या पत्नी वर्षा राउत यांना कोरोनाची लागण, संजय राउतांनी नुकतीच घेतली होती शरद पवारांची भेट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात 24 तासांत 47 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण

शिवसेना खासदार संजय राउत यांच्या पत्नी वर्षा राउत यांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्षा राउत यांना गेल्या 2 दिवसांपासून ताप आणि सर्दी-खोकल्याची लक्षणे दिसून येत होती. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. वर्षा यांना फोर्टीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोबतच, संजय राउत यांनीही कोरोनाची चाचणी केल्याचे समजते. राउत यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत.

राउत कुटुंबात कोरोना, पवार कुटुंबीय चिंतीत

संजय राउत यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पवार कुटुंबियांसाठी चिंता वाढली आहे. शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी संजय राउत यांनी ब्रीच कँडी रुग्णालय गाठले होते. त्यानंतर आता राउत यांच्या पत्नी वर्षा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. संजय राउत यांचा कोरोनाचा अहवाल अद्याप समोर आला नाही. तरीही राउत यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास शरद पवारांना सुद्धा कोरोना विषाणूचा धोका असू शकतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर आणखी एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेला हा कर्मचारी आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहेत. रश्मी ठाकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर आदित्य ठाकरे यांची चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांची सुटका केली जाईल.

राज्यात 24 तासांत 47 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण
गेल्या 24 तासांत राज्यांत तब्बल 47,827 नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत. ही कोरोना महामारी सुरू झाल्यापासूनची उच्चांकी संख्या आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 29 लाख 4076 वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही 3 लाख 89,832 वर गेली आहे. गुरुवारी 202 रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या 55,379 झाली आहे. दुसरीकडे, दिवसभरात 24126 रुग्ण बरे होऊन घरीही परतले. राज्यातील एकूण कोरोनामुक्तांचा आकडा आता 24 लाख 57 हजार 494 झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.32 टक्क्यांवर आले आहे. राज्याचा मृत्यूदर 1.91% इतका आहे.

बातम्या आणखी आहेत...