आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेच्या नोटिसीला राऊतांची केराची टोपली:नोटिसीची मुदत संपूनही केला नाही काहीच खुलासा

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्य विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याप्रकरणी विधानसभेत हक्कभंग सूचना दाखल झाली आहे. त्यासंदर्भात लेखी खुलासा ४८ तासात करावा, अशी नोटीस विधानसभा अध्यक्षांनी बजावली होती. सदर नोटीसची मुदत संपली आहे. विधिमंडळाच्या नोटीसीला राऊत यांनी केराची टोपली दाखवली असून विधिमंडळ सचिवालय राऊतांना स्मरणपत्र पाठवणार असल्याचे समजते. विधानसभेत भाजप व शिंदे गटाच्या तीन आमदारांनी राऊत यांच्यावर हक्कभंग सूचना दाखल केली आहे. याप्रकरणी विधानसभेची १५ सदस्यांची हक्कभंग समिती नेमण्यात आली आहे. होळी व सु्ट्यामुंळे चार दिवस विधिमंडळाचे कामकाज बंद होते. बुधवारी कामकाज सुरु होणार आहे. या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे राऊत यांच्यावर दाखल केलेल्या हक्कभंग सूचनेवर निर्णय देणार आहेत. राऊत यांनी सोमवारी देखील शिंदे गटावर जोरदार प्रहार करून आगामी काळात आमचीच सत्ता येणार असल्याचे या वेळी सांगितले.

बुधवारी निर्णय समजेल विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाने हक्कभंगाची सूचना उपसभापतींकडे दिली आहे. त्याविषयी निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. एकूण, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर दाखल झालेली हक्कभंगाची प्रकरणे तडीस नेतात की आपापसात मांडवली करतात, हे बुधवारी समजेल.

बातम्या आणखी आहेत...