आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांनी ढूं...वर लाथ मारली असती:राऊतांची शिंदे गटावर टीका; मोरारजींनी मराठी माणसांवर गाडी घातल्याची परिस्थिती आली

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही आधी बाळासाहेबांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी आधी येत होतो. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी येतो असे सांगतानाच बाळासाहेबांनी यांना ढूं...वर लाथ मारून हाकलून दिले असते, अशी टाक खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर केली.

पूर्वजांनी मुंबईसाठी बलिदान दिले होते. यावेळी मोरारजींनी मराठी माणसांच्या अंगावर गाडी घालत त्यांचे बळी घेतले होते, अशीच परिस्थिती आता आली आहे. गद्दार मराठी माणसांच्या सहाय्याने मुंबई विकायला निघाले आहेत, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले की, बाटगा आणि कोडगा नेमके काय हे सर्व यातून दिसून येत आहे. बाळासाहेबांच्या विचाराचे आम्हीच केविलवाणे प्रकार शिंदे गटाकडून सुरू आहेत, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. पण जर आज बाळासाहेब असते तर यांच्या ढूं...वर लात मारत त्यांचे मिठी नदीत विसर्जन केले असते. बाळासाहेबांचे स्थान हे ह्रदयात आहेत, त्यांचे विचार हे डोक्यात असायला हवे असे सांगतानाच या बाजारू लोकांना बाळासाहेब कधी कळले नाही. त्या नकली लोकांना बाळासाहेब काय हे काय कळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राममंदिर बाळासाहेबांची प्रेरणा

बाळासाहेबांमुळे राममंदिर हे बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायशलयाने जी भूमिका बजावली आहे ते विसरता येणार नाही असे सांगायला ही विनायक राऊत विसरले नाही. तर आमदारांसह खासदारांच्या प्रवेशावर बोलताना राऊत म्हणाले की आमची खासदारकी ही विकावू नाही. जे लोक आहोत ते कायम शिवसेनेसोबतच आहोत असे सांगताना राऊत म्हणाले की, शिंदे गटाने दिवा स्वप्न बघू नये असे सांगतानाच भाड्याने खासदाराकी विकायला काढली नाही.

बातम्या आणखी आहेत...