आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकेचे बाण:'शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीमुळे खळबळ वगैरे काही माजणार नाही, ही तर...' निलेश राणेंची राऊतांवर विखारी टीका 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत लवकरच शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध होणार आहे. स्वतः संजय राऊत यांनीच रविवारी एक ट्विट करून ही माहिती दिली होती. 'पवार साहेब महाराष्ट्रातील घडामोडींपासून चीनपर्यंतच्या मुद्द्यावर जोरदार बोलले आहेत. ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल,' असा दावाही संजय राऊतांनी ट्विटच्या माध्यमातून केला. मात्र आता यावर निलेश राणेंनी टीका केली आहे. राऊतांनी शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीमुळे खळबळ वगैरे काही माजणार नाही असे निलेश राणे म्हणाले.    निलेश राणे हे सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात. विशेषतः संजय राऊतांवर त्यांचा निशाणा असतो. आज त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. 'पवारांच्या मुलाखतीनं खळबळ वगैरे काही माजणार नाही. ही फक्त राऊत यांची वळवळ आहे. देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन त्यातल्या काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग,' असा सवाल नीलेश राणे यांनी केला आहे. 'लोकं चिडली आहेत, यांच्या इंटरव्यूमध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. खरं कौशल्य लढण्यात असतं, बोलण्यात नसतं,' असा टोलाही नीलेश राणे यांनी राऊत व पवारांना लगावला आहे. 

संजय राऊतांनी रविवारी केले होते असे ट्विट 

बातम्या आणखी आहेत...