आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Ravi Mhatre Replaced Narvekar In Shiv Sena? Why Is Narvekar Upset With Ravi Mhatre's Growing Weight In Shiv Sena? So The News Of The Shinde Group?

शिवसेनेतील नार्वेकरांची जागा बाळासाहेबांचे निकटवर्तीय रवी म्हात्रेंनी घेतली?:म्हात्रेंच्या वाढत्या वजनामुळे नार्वेकर ठाकरेंवर नाराज?

मयूर वेरूळकर l मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या राजकारण सध्या मोठी उलथापालथ झालेली पहायला मिळत आहे. काही 4 जण उद्धव ठाकरेंना भेटू देत नाही असे म्हणत शिंदे गटात अनेक जण गेले. मात्र ज्या चौघांवर आरोप करण्यात आले त्यातील उद्धव ठाकरेंच्या सर्वाधिक जवळचे असणारे मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याचा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरेंच्या जवळ असलेल्या लोकांमध्ये बदल होताना दिसून येत आहे. बाळासाहेबांचे निकटवर्तीय असलेले रवी म्हात्रे हे आता उद्धव ठाकरेंच्या जवळ जात असल्याचे दिसून येत आहे. म्हात्रेंच्या वाढलेल्या वजणामुळे नार्वेकर पक्षात नाराज झाले असावे अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू असून ते शिंदे गटात येतील असे शिंदे गटातील मंत्र्यांने सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नेमके कारण काय?
शिंदेंनी केलेल्या बंडानंतर रवी म्हात्रे अनेक पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंच्या सोबत दिसून आले. तर गटप्रमुखांच्या मेळाव्यातही रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत दिसून आले. तर दुसरीकडे मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेच्या कामात शिंदेंच्या बंडानंतर जास्त सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे म्हात्रेंचा वाढलेला प्रभाव हा नार्वेकरांच्या नाराजीचे कारण आहे, की पक्षातील सदस्याच्या नार्वेकरांच्या प्रती असलेला नाराजीचा सुर लक्षात घेत ठाकरेंनीच नार्वेकरांच्या जागी म्हात्रेंना संधी दिली की काय अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नार्वेकरांचे टविट हरी चर्चेत

नार्वेकरांच्या घरी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची घेतलेली भेट आणि नार्वेकरांनी ब्रह्मोत्सवाच्या 5 व्या दिवशी मानाच्या गरुड वाहनाचे साक्षीदार होण्याचा बहुमान लाभला. हे ट्विटमुळे मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चांना उधान आले आहे. यात त्यांच्यासोबत भारताचे सरन्यायाधीश उदय लळीत जी, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी जी आणि तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष सुब्बारेड्डी यांच्यासह श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दिसून येत आहे.

शिंदेंसोबत असणारी मैत्री

गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती. तर दुसरीकडे नार्वेकरांच्या हालचाली या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी धोकादायक आहेत की काय असे वातावरण निर्माण झाले आहे. कारण नार्वेकरांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत असलेले मैत्री पूर्ण संबंध यामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या गटात जाणार का पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोण आहेत रवी म्हात्रे?
रवी म्हात्रे हे बाळासाहेबांचे सहाय्यक होते. बाळासाहेबांच्या काळात अगदी शाखाप्रमुखापासून ते खासदारांप्रर्यत प्रत्येक जण हा म्हात्रेंकडे आपल्या समस्या घेऊन येत होते. मात्र गेली काही वर्षे रवी म्हात्रे हे पक्षात सक्रिय आहेत की नाही आसे वातावरण तसयार झाले होते. मात्र शिंदे गटात गेलेल्या आमदारांनी चार जण उद्धव ठाकरेंना कुणालाच भेटू देत नाही असा आरोप करत आपला वेगळा गट स्थापण केला. यानंतर मात्र बाळासाहेबांचा सहाय्यक असलेले रवी म्हात्रे पुन्हा नव्या जोमाने मातोश्रीसह शिवसेनेत कामाला लागले आहे. जसे बाळासाहेबांच्या सर्व कामाचे ते नियोजन म्हात्रेंकडून करण्यात येत होते. याच पद्धतीने म्हात्रेंनी मुंबईतील शिवसेनेच्या गटप्रमुख मेळाव्याचे नियोजन केल्याने आता ते पुन्हा मातोश्रीच्या जवळ गेले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे उद्धव ठाकरेंच्या जवळची मंडळी बदलताना दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...