आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याची भाजप -आरएसएसची जुनी परंपराच आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते, असे विधान केले. या विधानाशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहमत आहे. असे मत प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी व्यक्त केले आहे.
वरपे काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे म्हणाले की, स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केले आहे. परंतु संघ-भाजपला छत्रपती संभाजी महाराजांविषयी आकस आहे. त्याच कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवळकर यांनी लिहलेल्या 'बंच ऑफ थॉट' या त्यांच्या पुस्तकात पान क्रमांक 223 वरती संभाजी महाराज हे स्त्रीलंपट आणि दारुडे होते असा उल्लेख केलेला आहे. तसेच सावरकर आणि रामदास स्वामींनी अपशब्द काढलेले आहेत.
सावरकरांचा निषेध करावा
रविकांत वरपे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने अजितदादांच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा आरएसएसच्या मुख्यालयावरती मोर्चा काढावा आणि गोलवळकरांच्या 'बंच ऑफ थॉट' या पुस्तकाची होळी करावी आणि सावरकर आणि रामदास स्वामी यांचा निषेध व्यक्त करावा तरच आम्ही समजू की यांच छत्रपती संभाजी महाराजांविषयीचे हे खरे प्रेम आहे.
तेव्हा का बोलले नाही?
रविकांत वरपे म्हणाले की, जो आरएसएसचा काळा इतिहास आहे त्याला भाजप लपवू शकत नाही. ज्यावेळी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीमाई फुले यांचा अपमान केला,त्यावेळी भाजपचे नेते कोणत्या बिळात लपून बसले होते. मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी अजित पवारांनी घेतलेली भूमिका ही योग्य आणि सर्वसमावेशक आहे हेच खरे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.