आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवींद्र धंगेकर-अश्विनी जगताप यांनी घेतली शपथ:धंगेकरांनी आपल्या नावापुढे आईचे नाव लावून वेधून घेतले लक्ष

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुका झाल्या. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर व अश्विनी जगताप यांनी आज शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जगताप आणि धंगेकर यांना शपथ दिली.

आमदार रवींद्र धंगेकर यांनी शपथ घेताना आपल्या नावापुढे आपल्या आईचे नाव लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर अश्विनी जगताप यांनी पिंपरी चिंचवडच्या मतदारांसह स्व. लक्ष्मण जगताप यांना तर रविंद्र धंगेकरांनी कसबावासियांना स्मरण करून शपथ घेत असल्याचे नमूद केले.

अशी घेतली धंगेकरांनी शपथ

शपथ घेताना रविंद्र धंगेकर म्हणाले की, 'मी प्रथम माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नमस्कार करतो. मी रविंद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने' असा उल्लेख करत धंगेकरांनी शपथ घेतली.

निधनाने रिक्त झालेल्या जागा

शपथ घेतल्यानंतर धंगेकर आणि जगताप यांनी विरोधी पक्ष तसेच सत्ताधाऱ्यांना अभिवादन केले. यावर सर्वांनी बाकडे वाजवून त्यांचे स्वागत केले. कसबा पेठ मतदार संघातून भाजपच्या मुक्ता टिळक या आमदार होत्या. मात्र, कर्करोगाशी झुंजताना त्यांचे निधन झाले. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड येथील जागाही आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झाली होती. या दोन्ही जागांवर निवडणुका घेण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...