आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:आता आपण रांगायचं नाही, धावायचं : मुख्यमंत्री, रवींद्र वायकर यांची पुन्हा ‘सीएमओ’मध्ये वर्णी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वायकर ‘मातोश्री’च्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जातात

‘काळजी करू नका. तुमची अडलेली सर्व कामे होतील. सरकार गतीने काम करत आहे. आता आपण रांगायचं नाही, पळायचं आहे,’ या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना आमदारांना आश्वस्त केले. तसेच शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात वर्णी लागणार हे आता निश्चित झाले आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वपक्षीय आमदारांची गाऱ्हाणी ऐकली. मुख्यमंत्र्यांच्या व्हर्च्युअल बैठकीत शिवसेनेचे सर्व आमदार सहभागी झाले हाेते.

मुख्यमंत्रीी म्हणाले, ‘तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील प्रलंबित कामांची काळजी आहे. पण, चिंता करू नका. तुमची कामे गतीने मार्गी लागावी याची सोय करण्यात आली आहे. तुम्ही तुमची कामे आमदार रवींद्र वायकर यांच्याकडे द्या. ते तुमच्या कामांचा सरकारकडे पाठपुरावा करतील. तुमची कामे तांत्रिक बाबीत कशी बसवायची हे वायकर पाहतील. कामासंदर्भात तुम्ही निश्चिंत राहा.’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांची व कार्यकर्त्यांची कामे गतीने मार्गी लावतात. मात्र, सेना नेत्यांची कामे गतीने होत नाहीत, अशा वारंवार उद्धव यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नेमणूक करण्याची प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण झाली आहे. मागच्या वेळी झालेली चूक या वेळी होणार नाही, अशी माहिती एका सेना नेत्याने दिली. फेब्रुवारी २०२० मध्ये वायकर यांची सीएमओ कार्यालयात व खासदार अरविंद सावंत यांची सेना आमदारांचे समन्वयक म्हणून नेमणूक करण्याचा उद्धव यांचा इरादा होता. त्याचे शासन निर्णय जारी झाले हाेते.

‘मातोश्री’च्या अत्यंत जवळचे म्हणून आेळखले जातात
रवींद्र वायकर आमदार आहेत. त्यांची नेमणूक तांत्रिकदृष्ट्या चुकीची होईल अशी भीती उद्धव यांना तत्कालीन मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घातली होती. आश्चर्य म्हणजे मेहता निवृत्त झाल्यानंतर त्यांचीच मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून मुख्यमंत्री कार्यालयात नेमणूक झाली. रवींद्र वायकर हे मुंबईतील जाेगेश्वरीचे शिवसेना आमदार आहेत. ‘मातोश्री’च्या अत्यंत जवळचे म्हणून वायकर यांना ओळखले जाते. मागच्या फडणवीस सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते.

बातम्या आणखी आहेत...