आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Reacting To Kangana's Statement, Sharad Pawar Said, "People In The State Are Aware Of The Authority Of Mumbai Police, So Such Statements Should Not Be Taken Too Seriously."

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना प्रकरण:कंगनाच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले - राज्यातील लोकांना मुंबई पोलिसांचे कतृत्त्व माहिती आहे, यामुळे अशी वक्तव्ये जास्त गांभीर्याने घेऊ नयेत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री कंगना रनोट आपल्या बहिणीसमवेत वाय श्रेणी सुरक्षेमध्ये मुंबईत दाखल झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आणि यानंतर एक गदारोळ सुरू झाला. राज्यातील सरकारने तिच्याविरोधात यानंतर आक्रमक भूमिका घेतली. आता या सर्व प्रकणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशी वक्तव्य करणाऱ्यांना जास्त महत्त्व दिलंय जातंय असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेलाच टोला लगावला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

शरद पवार या संपूर्ण प्रकरणाविषयी बोलताना म्हणाले की, 'कंगनाविषयी मला वाटतं की, अशी वक्तव्य करणाऱ्यांना आपण जास्त महत्त्व देत आहोत. अशी वक्तव्य केल्याने जनमानसावर काय परिणाम होईल पाहावं लागेल मात्र मला वाटतं की, हे कोणी गांभीर्याने घेत नाही. तसेच महाराष्ट्राला आणि मुंबईतील नागरिकांना मुंबई पोलिसांचे कतृत्त्व चांगलेच माहिती आहे. यामुळे जर कोणी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली तर जास्त गांभीर्याने घेऊ नये. '

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?, असे ट्विट कंगनाने केले होते. यानंतर हा सर्व वाद सुरू झाला.

अभिनेत्री कंगना रनोट आपल्या बहिणीसमवेत वाय श्रेणी सुरक्षेमध्ये मुंबईत दाखल झाली आहे. कंगनाला पाठिंबा देण्यासाठी रामदास आठवले यांचे दोन डझनहून अधिक कार्यकर्तेही मुंबई विमानतळावर हजर आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील काळे झेंडे आणि बॅनर घेऊन दाखल झाले असून ते कंगनाला आपला विरोध दर्शवत आहेत. विमानतळावर सुरक्षेसाठी मुंबई पोलिस आणि सीआयएसएफची मोठी टीम तैनात आहे. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने कंगनाला दुस-या गेटमधून बाहेर काढण्यात आले आहे.

आज सकाळी मुंबईतील ऑफिसमध्ये झाली तोडफोडबुधवारी सकाळी बेकायदा बांधकामांबाबत मुंबई महापालिकेने कंगनाच्या मुंबईस्थित कार्यालयावर हातोडा पाडला. ही कारवाई सकाळी 10.30 वाजता सुरू झाली आणि दुपारी 12.40 पर्यंत चालली. या ऑपरेशन दरम्यान, बाल्कनी आणि कार्यालयाच्या बाहेरील बाजूचे बांधकाम तोडण्यात आले आहे. यावेळी जवळपास राहणा-या काही लोकांनी या तोडफोडीला विरोधही केला होता. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवारी दुपारी तीन वाजता होईल.