आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:क्वारंटाइन शिक्क्याने रिअ‍ॅक्शन, सरकार लोकांना अशा प्रकारे शिक्के मारून दुखावत आहे : नितेश राणे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिक्के मारताना जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली गेली नाही

मुंबई-पुण्याहून गावाकडे परतणाऱ्याच्या हातावर होम क्वाॅरंटाइनचे शिक्के मारले जात आहेत. त्यामुळे एका मुलीच्या हातावर रिअ‍ॅक्शन उमटली. डाग पडून फोडही आले आहेत. त्यावरून आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे.

गावातून शहरांकडे जाणाऱ्या तसेच गावाकडे येणाऱ्यांची गावाच्या सीमेवर नोंदणी आणि तपासणी केली जात आहे. त्यांनी आपल्या घरातच राहावे यासाठी त्यांच्या हातावर होम क्वाॅरंटाइनचे शिक्केही मारले जात आहेत. शेकडोंच्या संख्येने लोक येत असल्याने एकाच शिक्क्याच्या माध्यमातून सर्वांच्या हातावर ठप्पा मारला जात आहे. सिंधुदुर्ग सीमेवर एका मुलीच्या हातावर शिक्का मारला गेला. दुसऱ्या दिवशी तिचा हात काळा झाला, सुजला आणि त्यावर फोडही आलेत. हे शिक्के मारताना जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली गेली नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकार लोकांना अशा प्रकारे शिक्के मारून दुखावत आहे. त्यामुळे निराशा निर्माण झाल्याची टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...