आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया:लालबागच्या राजाच्या दर्शनासह मुख्यमंत्र्यांकडे जाणार, तर एक राजकीय बैठक घेतील

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौऱ्याबाबत माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गणपती दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दरवर्षी मुंबईत येतात. मुंबई ही अमित शहा यांची जन्मभुमी आहे. त्यामुळे मुंबईशी त्याचा एक विशेष जिव्हाळा आहे. मुंबईत आल्यानंतर शहा हे लालबागच्या राजाचे दर्शन घेतेल. त्यानंतर ते भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जातील. तसेच ते मुंबईतील एका शाळेचेही उद्घाटन करणार आहेत. अमित शहा यांच्या विचारांचा आणि भेटीचा आम्हाला लाभ व्हावा म्हणून एक राजकीय बैठकही होणार आहे.

शरद पवारांच्या आरोपांना उत्तर
केंद्रातील भाजप सरकार ईडी आणि आयकर विभागाचा वापर करुन विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी केला आहे. यावर विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी ऐवढे काम केले आहेत. त्यावर विरोधकांकडे उत्तरे नाहीत. म्हणून सध्या असा एक ट्रेंड चालू आहे. जेव्हा कामाला कामाने उत्तर देता येत नाही. तेव्हा असे आरोप केले जातात. त्यामुळे विरोधकांना माझा सल्ला आहे की, मोदींनी विकासाची जी रेषा ओढली आहे. त्यापेक्षा मोठी रेषा ओढण्यासाठी प्रयत्न करा.

शेलार यांचे ट्विट
अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर भाजपचे नेते मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी माध्यमांमध्ये चालवल्या जाणाऱ्या बातम्या दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या घोशित कार्यक्रमाव्यतिरिक्त अन्य राजकीय भेटीसाठीबाबत कपोलकल्पित, उलटसुलट बातम्या चालवण्याता खोडसाळपणा स्वखुशीने माध्यमांमध्ये सुरु आहे, तो फार हास्यास्पदच. अमितभाईंच्या मुंबई दौऱ्यात नेहमीच अशा टेबलस्टोरींना ऊत येतोच, दुर्दैवी!

शहा यांचा दौरा राजकीय दृष्टीने महत्त्वाचा

अमित शहा हे येत्या 5 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर येत असलेले केंद्रीय गृहमंत्री हे मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील अमित शहासोबत दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापाूसन गणेशोत्सवात अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी मुंबईत येत असतात. मात्र, यंदा त्यांचा दौरा हा राजकीय दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...