आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक निकालावर राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया:सत्ताधारी : देशात नरेंद्र मोदींची जादू कायम, विरोधक : उद्योग पळवल्याने गुजरातचा विजय

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणूक निकालाने सातव्यांदा भाजपने सत्ता मिळवण्यात यश मिळवले. त्यावर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी भिन्न टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विरोधकांनी गुजरातच्या यशाचे श्रेय महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचे असल्याचा आरोप केला. तर सत्ताधारी भाजपने मोदींचा करिष्मा अजून संपलेला नाही, असे सांगितले. गुजरातमधील भाजपच्या विजयाचे श्रेय पवारांनी केंद्राने एका राज्यासाठी घेतलेल्या निर्णयांना दिले. पवार म्हणाले की, गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्यात आली. त्याचा हा परिणाम होणार, हे सर्वांना माहिती होते. पण गुजरातचा निकाल लागला याचा अर्थ देशात एका बाजूने मतप्रवाह आहे, असा नाही. कारण दिल्लीत भाजपची सत्ता आपने खेचून आणली, असा दावा त्यांनी केला.

आपने मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा केला पळवलेले उद्योग भाजपच्या फळाला आले : उद्धव ठाकरे “गुजरातमधील विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत, अशी उपरोधिक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला, हे स्पष्ट आहे. ज्यांचे त्यांचे राजकारण सोयीनुसार चालत असते, असेही ठाकरे यांनी या वेळी बोलताना सांगितले.

आता महाराष्ट्रात निवडणुका घ्या : आदित्य ठाकरे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, “आता तरी महाराष्ट्रात निवडणुका घ्या, घाबरण्याची काय गरज आहे, राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका होणे बाकी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकदा लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन जाऊ द्या” असे म्हणत आदित्य यांनी भाजपला आव्हान दिले.

हिमाचलमध्ये आमच्या विजयाने भाजपची उलटगिनती : पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपची देशात उलटगिनती सुरू असल्याचा दावा केला. ते म्हणाले, “हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करून विजयाची पताका फडकवली आहे. राजस्थान व छत्तीसगड विधानसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत, असेही पटोले यांनी या वेळी सांगितले.

गुजरातसह देशात मोदींचीच जादू : एकनाथ शिंदे गुजरात निकालास मोदींची जादू कारणीभूत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. शिंदे म्हणाले, ‘मोदींची जादू देशात आणि विदेशात सगळीकडे आहे. गुजरातचा एक चांगला निकाल आला आहे.

लाेकांना वाटते मोदीच विकासपुरुष : फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातच्या यशाचे श्रेय नरेंद्र मोदी यांना दिले. २७ वर्षे राज्य करूनही भाजपवर मतदारांनी विश्वास दाखवला आहे. लोकांना वाटते फक्त मोदीच विकास करू शकतात. मी गुजरातमध्ये ते अनुभवले आहे.

बातम्या आणखी आहेत...