आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Ready Reckoner Rate: Maharastra Revenue Minister Balasaheb Thorat Explaine Not Increase Ready Reckoner Rate; Stamp Duty News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:रेडीरेकनर दरात वाढ नाही, मुद्रांक शुल्क सूट संपुष्टात; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्पष्टीकरण

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिला गृह खरेदीदारांना मुद्रांक शुल्कात १% सूट

सन २०२१-२२ साठी वार्षिक मूल्यांकन दरात (रेडीरेकनर) राज्य सरकारने कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीचाच रेडीरेकनर यंदाही लागू असेल. दरम्यान, मुद्रांक शुल्कातील सवलत ३१ मार्चपासून बंद करण्यात आली आहे. महिला घर खरेदीदारांना १% मुद्रांक शुल्क सवलत मिळेल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी दिली. ते म्हणाले, सप्टेंबर २०२० मध्ये रेडीरेकनर दरात वाढ झाली हाेती. त्यामुळे बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला. परंतु मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे बांधकाम व्यवसाय व मालमत्ता खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला. त्या पार्श्वभूमीवर क्रेडाईने रेडीरेकनर दरात वाढ करू नये, अशी विनंती केली होती.

महिला गृह खरेदीदारांना मुद्रांक शुल्कात १% सूट

  • जागतिक महिला दिनानिमित्त महिला किंवा महिलांच्या नावाने घरांच्या खरेदी-विक्रीवर मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलतीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली होती. ती १ एप्रिल २०२१ पासून लागू झाली. महिलांच्या नावाने होणाऱ्या घराच्या अभिहस्तांतरण वा विक्री करारपत्राच्या दस्तावर मुद्रांक शुल्काच्या १% सवलत मिळेल.
  • तथापि, या सवलतीचा लाभ घेतल्यानंतर महिला खरेदीदाराला खरेदी दिनांकापासून १५ वर्षांच्या कालावधीपर्यंत कोणत्याही पुरुष खरेदीदारास विकता येणार नाही. अशा प्रकारे विक्री केल्यास कमी केलेले एक टक्के मुद्रांक शुल्क व लागू होणारा दंड भरावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...