आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्विट:एक 'था' कपटी राजा; राजकीय परिणाम होण्याची शक्यता लक्षात येताच केले ट्विट डिलिट

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे 30 आमदारांना सुरतमध्ये नेल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. ठाकरे सरकार संकटात असताना आता यामध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करीत मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला; पण लगेचच अमृता यांनी हे ट्विट डिलीट केले.

काय आहे ट्विट?

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकांउंटवर एक ट्विट केले असून त्यात एक था कपटी राजा असा आशय होता. यात था या शब्दाला अवतरण चिन्ह त्यांनी लावले होते पण हे ट्वि्ट त्यांनी लगेचच डिलीट केले.

'था' हा शब्द मुख्यमंत्र्यांना उद्देशून?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही अधिक आक्रमक भाषेत टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आज एक था कपटी राजा हे ट्विट केले. 'था' या शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी वापरला असण्याची शक्यता आहे.

म्हणून ट्विट केले डिलीट

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार सुरतला गेले आहे या घडामोडी घडत असताना अमृता फडणवीस यांच्या ट्विटचा राजकीय परिणाम होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर हे ट्विट डिलीट केले गेले असावे अशी शक्यता आहे.

चंद्रकांत पाटलांची चुप्पी

अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या ट्विटवरुन माध्यमांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला. यावर पाटील यांनी ''मी आज प्रवासात होतो अमृता फडणवीस यांनी काय ट्विट केले हे मला माहित नाही.'' असे स्पष्ट करीत या विषयावर बोलण्याचे टाळले.

बातम्या आणखी आहेत...