आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:शिंदेसेनेचे बंड, देवेंद्रांना पुन्हा राजयोग, शिंदेंसह 41 बंडखोर आमदार रात्रीतून गुवाहाटीला रवाना

मुंबई/ सूरतएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीत दोन्ही उमेदवार विजयी झाल्याने काहीसे निश्चिंत असलेल्या शिवसेनेला पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी त्याच रात्री जबर धक्का दिला. पक्षाविरोधात बंड करत शिंदे यांनी सुमारे ३५ आमदारांचा गट घेऊन थेट सूरत गाठले. भाजप नेत्यांनी या बंडासाठी त्यांना रसद पुरवली. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या बंडाची कुणकुण लागेपर्यंत हे सर्व आमदार गुजरात सरकारच्या सुरक्षेत सुरतमधील ला मेरिडियन हॉटेलमध्ये पाहुणचार घेत होते. दिवसभर भाजप नेत्यांशी चर्चेनंतर रात्री उशिरा या बंडखोर आमदारांना विशेष विमानाने भाजपशासित गुवाहाटीत (आसाम) पाठवण्याची तयारी सुरू होती.

शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाळीने उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच अल्पमतात आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे केंद्रीय नेते पडद्यामागून या नाट्याची सूत्रे हलवत आहेत. शिवसेनेतील दोन तृतीयांश आमदार (३७) शिंदे गटाच्या गळाला लावून त्यांच्या पाठिंब्यावर पुन्हा फडणवीस यांचे सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सरकार जाणार हे लक्षात आल्यानंतर शिवसेना नेतृत्वाने थेट सुरतला ‘दूत’ पाठवून शिंदेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात फारसे यश आले नाही. २०१९ मध्ये अजितदादांचे बंड मोडून काढणाऱ्या शरद पवारांनी या वेळी मात्र हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत हात झटकले. काँग्रेसनेही हीच भूमिका घेतली.

विधिमंडळ गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी
बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंची विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी करून त्यांच्या जागी शिवडीचे आमदार अजय चौधरींची निवड झाली. विधानसभा उपाध्यक्षांना १७ आमदारांच्या सहीचे पत्रही देण्यात आले. त्यानंतर शिंदेंनी ट्वीट केले. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक. त्यांनीच आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघेंची शिकवण याबाबत आम्ही सत्तेसाठी कधी प्रतारणा केली नाही व करणारही नाही.

ठाकरेंना धक्का : एकनाथ शिंदेंसह बंडखोर ३५ आमदार रात्रीतून सुरतमध्ये पोहोचले

भाजप : गुजरात, महाराष्ट्र भाजप नेत्यांनी केली हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था

स्थलांतर : दिवसभर चर्चेनंतर मध्यरात्री बंडखोर आमदारांना गुवाहाटीत हलवणार

सुरतला पोहोचलेल्या सेना आमदारांची यादी
१. एकनाथ शिंदे - कोपरी २. अब्दुल सत्तार - सिल्लोड, औरंगाबाद ३. शंभुराज देसाई - पाटण, सातारा ४. संदिपान भुमरे - पैठण, औरंगाबाद ५. भरत गोगावले - महाड, रायगड ६. नितीन देशमुख - बाळापूर, अकोला ७.अनिल बाबर - खानापूर-आटपाडी, सांगली ८.विश्वनाथ भोईर - कल्याण पश्चिम ९. लता सोनवणे- चाेपडा १०. संजय गायकवाड - बुलडाणा ११. संजय रायमूलकर - मेहकर १२. महेश शिंदे - कोरेगाव, सातारा १३. शहाजी पाटील - सांगोला, सोलापूर १४. प्रकाश आबिटकर - राधानगरी, कोल्हापूर १५ संजय राठोड - दिग्रस, यवतमाळ १६. ज्ञानराज चौगुले - उमरगा, उस्मानाबाद १७. तानाजी सावंत - परंडा, उस्मानाबाद १८. संजय शिरसाट - औरंगाबाद पश्चिम १९. रमेश बोरनारे - वैजापूर, औरंगाबाद २०. श्रीनिवास वनगा, पालघर २१. बालाजी कल्याणकर -नांदेड २२. बालाजी किणीकर- अंबरनाथ २३. सुहास कांदे -नांदगाव २४. महेंद्र दळवी- अलिबाग २५. प्रकाश सुर्वे -मागाठणे २६. महेंद्र थोरवे -कर्जत २७. शांताराम मोरे -भिवंडी २८.किशोर पाटील- पाचोरा २९. चिमणराव पाटील- एरंडोल ३०. प्रदीप जैस्वाल- औरंगाबाद

उद्धव ठाकरेंच्या संपर्कातील आमदार : १. वैभव नाईक २. उदयसिंह राजपूत ३. रवींद्र वायकर ४. राहुल पाटील ५. उदय सामंत ६. प्रकाश फातर्पेकर ७. सुनील प्रभू ८. गुलाब पाटील ९. भास्कर जाधव १०. संतोष बांगर ११. आदित्य ठाकरे १२. राजन साळवी १३. अजय चौधरी १४. दिलीप लांडे १५. सदा सरवणकर १६. दादा भुसे १७. संजय पोतनीस १८. सुनील राऊत १९ कैलास पाटील २०. दीपक केसरकर २१.यामिनी जाधव २२. रमेश कोरगावकर २३. योगेश कदम २४. मंगेश कुडाळकर २५ प्रताप सरनाईक यापैकी काही आमदार शिंदेंच्या संपर्कात.