आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

एटीएम :एटीएममधून जास्तीत जास्त ५ हजार रुपये काढण्याची शिफारस, रिझर्व्ह बँकेच्या शुल्क समितीचा अहवाल

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लहान शहरांमध्ये मोफत ट्रान्झॅक्शन संख्या सहा करण्याची शिफारस

आगामी काळात एटीएममधून पैसे काढणे महाग पडू शकते. यासोबत एटीएममधून ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास मनाई केली जाऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका समितीने ही शिफारस केली आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने अद्याप या शिफारशींवर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

एटीएम इंटरचेंज फी-स्ट्रक्चरच्या आढाव्यासाठी इंडियन बँकर्स असोसिएशन(आयबीए)चे मुख्य कार्यकारी यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी स्थापन समितीने एटीएममधून रोकड काढण्यावर ५ हजार रुपयांपर्यंत मर्यादा ठेवण्याची शिफारस केली आहे. यासोबत मोठ्या निकासीवर शुल्क १६-२४% पर्यंत वाढवण्याची व फ्री-ट्रान्झेक्शनपेक्षा जास्त वेळा निकासीला परवानगी न देण्याची शिफारस केली आहे. सूत्रांनुसार, एटीएम संचालनाचा खर्च वाढल्याचे समितीने मान्य केले आहे. २०१२ पासून इंटरचेंज फीसचा आढावा झाला नाही. २००८ पासून एटीएम वापर शुल्कात कोणताही बदल झाला नाही. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून ग्राहक एका व्यवहारात १० हजार रुपये आणि एका दिवसात २० हजार रुपये काढू शकतो. अन्य बँकांमध्ये सिंगल ट्रान्झॅक्शन आणि दैनिक निकासीची मर्यादा वेगवेगळी आहे. आयसीआयसीआय बँकेत दैनिक निकासीची मर्यादा ५० हजार ते १.५० लाख रुपयांदरम्यान आहे.

रिझर्व्ह बँकेने जून २०१९ रोजी आपल्या पतधोरण आढाव्यात ही समिती स्थापन केली होती. समितीच्या अन्य सदस्यांत नॅशनल पेमेंट्स कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया(एनपीसीआय) दीलीप आसबे, एसबीआयच्या मुख्य महाव्यवस्थापकाचा समावेश आहे.


किती महाग होऊ शकते एटीएम?

{१० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येची शहरे 1. ट्रान्झॅक्शन मर्यादेपेक्षा जास्त वेळेस पैसे काढल्यास शुल्क १५ रु.वरून वाढून १७ रुपये. 2. बॅलन्स तपासणी, पिन बदलसारख्या कार्यात शुल्क ५ रुपयांवरून ७ रुपये.

{१० लाखांपेक्षा कमी लोकसंख्येची शहरे 1. फ्री-ट्रान्झॅक्शनची संख्या ५ वरून वाढून ६ होऊ शकते. 2. सहापेक्षा जास्त निकासीवर शुल्क १५ वरून वाढून १८ रुपये होऊ शकते. 3. बॅलन्स तपासणी, पिन बदलसारख्या कार्यात शुल्क ५ वरून वाढून ७ रुपये.

0