आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठाकरे सरकारचा दणका:देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंसह राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही झेड सिक्युरिटी आता काढून टाकण्यात आली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विरोधीपक्ष भाजपला दणका दिला आहे. राज्यातील भाजप नेत्यांसह बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात करत त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार असल्याची माहिती आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही राज्य सरकारने कपात केली आहे.

मनसे प्रमुखांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही झेड सिक्युरिटी आता काढून टाकण्यात आली आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडीही काढण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...