आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज दरवाढीचा शॉक:राज्यात 7.25 टक्के दरवाढ, महावितरणला दोन वर्षांत 22 टक्के दरवाढीस नियामक आयोगाची मंजुरी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी वीज ग्राहकांना दरवाढीचा मोठा झटका दिला. महावितरणच्या दरवाढ याचिकेवर शनिवारी सायंकाळी निर्णय जाहीर झाला. त्यामध्ये २ वर्षांत तब्बल २१% दरवाढीस कंपनीला मुभा दिली आहे. आयोगाच्या निर्णयानुसार कंपनीला आगामी २ वर्षात अतिरिक्त महसूल ३९,५६७ कोटी रुपये मिळणार आहे. २०२३-२४ मध्ये ७.२५% तर व दुसऱ्या वर्षी १४.७५% दरवाढ होईल. याचा अर्थ मंजूर केलेली दोन वर्षातील एकूण दरवाढ २२% आहे.

दुसरीकडे, महागडी वीज खरेदी, अकार्यक्षमता व भ्रष्टाचाराचा सर्व बोजा वीज टाकला आहे, दरवाढ चुकीच्या पद्धतीने दिली आहे. आयोगाच्या आदेशाच्या विरोधात विद्युत अपिलय प्राधिकरण यांच्याकडे अपील दाखल करू, अशी माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीज तज्ञ प्रताप होगाडे (इचलकरंजी) यांनी दिली.

असा बसेल राज्यातील वीज ग्राहकांना फटका महावितरणची वीज वितरण गळती २०२१-२२ या वर्षात १६.५७ % नसून २३.५४ % आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच शेतीपंपांचा वीज वापर कंपनी दावा करते त्यापेक्षा प्रत्यक्षात कमी आहे. घरगुती युनिट दरात ८७ पैशांची वाढ १. घरगुती ग्राहक (१०० युनिट पर्यंत): सध्या ४.७१ रुपये युनिट दर यंदा ५.५८ होईल, पुढच्या वर्षी ५.८८ पैसे प्रती युनीट असेल. २. व्यापारी ग्राहक (२० किलो वॅट पर्यंत): सध्या ८.४२ रुपये युनीट असलेला दर यंदा वर्षी ९.४४ होईल, पुढच्या वर्षी ९.६९ पैसे युनीट असेल. ३. शेतकरी ग्राहक (लघुदाब): सध्या ३.३० रुपये युनीटचा दर यंदा ४.१७ रुपये होईल, पुढच्या वर्षी तो ४.५६ पैसे प्रती युनीट असेल. ४. उद्योग ग्राहक (११/३३ केव्ही पर्यंत): सध्या ७.४४ रुपये युनीट दर यंदाच्या वर्षी ८.७२ पैसे होईल, पुढच्या वर्षी ८.९६ पैसे प्रती युनीट असेल. ५. शेती पंप ग्राहक (उच्चदाब): सध्या ४.२४ रुपये युनीटचा दर यंदा ५.९६ युपये होईल, तर पुढच्या वर्षी ६.३८ पैसे प्रती युनीट असणार आहे.