आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढीव बिले:तक्रार निवारण झाल्याशिवाय वीजपुरवठा खंडित करू नये, नियामक आयोगाचे कंपन्यांना आदेश

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे दिले निर्देश

राज्यभरातील ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले मिळण्याच्या तक्रारींची गंभीर दखल वीज नियामक आयाेगाने घेतली असून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण झाल्याशिवाय कुणाचाही वीजपुरवठा खंडित करू नये, असे निर्देश वीज कंपन्यांना देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी, असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहेत.

विजेच्या वाढलेल्या बिलाविषयी ग्राहकांमध्ये असंतोष असल्याचे दिसून आल्यानंतर आयोगाने वीज कंपन्यांच्या विशेषत: जून २०२० महिन्याच्या देयक आकारणी पद्धतीचा २७ जून रोजी आढावा घेतला. लॉकडाऊनच्या निर्बंधांतील शिथिलतेनंतर ज्या कालावधीसाठी निर्धारित तत्त्वावर बिले आकारले होते त्याचे समायोजन करून, प्रत्यक्ष मीटरमधील नोंदींच्या आधारावर बिले देण्यास वीज कंपन्यांनी सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्ष वीज वापराबरोबर सरासरी बिलाच्या समायोजनामुळे ग्राहकांना वाढीव बिले मिळाल्याचे निदर्शनास आले.

हे दिले निर्देश

- वीज बिलात पारदर्शकता व त्वरित प्रतिसादाकरिता यंत्रणा उभारावी.

- गाऱ्हाणी प्राप्त झाल्यापासून एक दिवसाच्या आत त्याला प्रतिसाद द्यावा.

- जेथे वीज बिल मार्च ते मे या कालावधीसाठीच्या सरासरी देयकाच्या दुप्पट आहे, अशा ग्राहकांना ३ हप्त्यांत बिल भरण्याचा पर्याय देण्यात यावा.

बातम्या आणखी आहेत...