आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठी डील:रिलायंस इंडस्ट्रीज आणि फेसबूक सोबत येऊन चाइनीज सुपर अॅप वी-चॅटला टक्कर देण्याच्या तयारीत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पेमेंट, गेमिंगसह सर्व सुविधांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या तयारीत

मुकेश अंबानींच्या नेतृत्वाची रिलायंस इंडस्ट्रीज आणि मार्क ज़ुकेरबर्गची फेसबूक सोबत मिळून व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्म आणि यूजर बेसचा  फायदा घेत चायनीज सुपर-अॅप वी-चॅटला टक्कर देण्यासाठी एक मल्टीपर्पज अॅप बनवण्याच्या तयारीत आहे. दोन्ही कंपन्या मिळून या प्रोजेक्टसाठी फंडिंग, टेक्निकल माहिती आणि डोमेन संबंधी माहिती घेत आहे.

जिओ डॉटकॉम आणि जिओ मनीचा उपयोग करण्याची सुविधा

मीडिया रिपोर्टनुसार कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमिवर या अॅपला लाँच करण्यामागे हा उद्देश आहे की, यूजर रिलायंस रिटेल स्टोर्स किंवा jio.com वरुन किराना किंवा जीवनावश्यक गोष्टी खरेदी करू शकतील आणि JioMoney चा उपयोग करुन पेमेंट करू शकतील. वी-चॅट समोर एक सुपर-अॅप बनवण्याची तयारी साठी की, हे नवीन अॅप डिजिटल पेमेंट, सोशल मीडिया, गेमिंग, एयर टिकट बुकिंग आणि हॉटेल बुकिंगसारखे काम एकाच अॅपवरु करेल.

मॉर्गन स्टॅनली इनवेस्टमेंट बँकर नियुक्त

याप्रकारच्या एका अॅप्लिकेशनमुळे रिलायंस इंडस्ट्रीज दोनप्रकारचा लाभ देईल. हे अॅप ग्राह आणि व्यवसायिकांसाठी बीटूसी प्लॅटफॉर्म देण्यासोबतच उपयोगकर्त्यांच्या खर्चाबाबत माहिती देईल. सध्या याचे कॉमर्शियल प्रयोग सुरू आहेत. या कामासाठी मॉर्गन स्टेनलीला इन्वेस्टमेंट बँकर नियुक्त तकण्यात आले आहे.

अंतिम रचना अद्याप स्पष्ट नाही

रिपोर्टनुसार परिस्थिती अद्याप स्पष्ट नाही आणि हेदेखील स्पष्ट नाही की, याची अंतिम रचा कशाप्रकारची असेल. या डीलवर काम करणाऱ्या एका सूत्राकडून माहिती मिळाली की, दोन्ही कंपन्या मिळून एक नवीन कंपनी स्थापन करू शकते आणि त्यात गुंतवणूक करू शकते. किंवा फेसबूक रिलायंस जिओ आणि रिलायंस रिटेलमध्ये गुंतवणूक करुन नवीन पार्टनर्शिप तयार होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...