आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन:पवारांविरोधात टिप्पणी; निखिल भामरेला जामीन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या नाशिक येथील फार्मसीचा विद्यार्थी निखिल भामरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. निखिल विद्यार्थी आहे हे लक्षात घेतले पाहिजे याकडे लक्ष वेधून केवळ सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल त्याला महिनाभरापासून तुरुंगवास भोगावा लागतोय याबद्दल न्यायमूर्ती नितीन जामदार यांनी नाराजी व्यक्त केली. २२ वर्षीय निखिलविरोधात विविध जिल्ह्यांमध्ये ६ गुन्हे दाखल आहेत. भामरेला पहिल्या आणि सहाव्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे.