आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपुरात जनआक्रोश मोर्चा:राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कडवे हिंदुत्ववादी हे लक्षात ठेवा ; राणे यांचा पाेलिसांना इशारा

श्रीरामपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे मंत्री आता नवाब मलिक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत, तर राज्याचे मुख्यमंत्री कडवे हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे पोलिसांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे हिंदूंवर अन्याय झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी शनिवारी श्रीरामपुरात दिला.

प्रेमप्रकरणातून भोकर येथील दीपक बर्डेचे अपहरण होऊन अनेक दिवस उलटूनही पोलिसांना त्याला शोधण्यात अपयश आले आहे. श्रीरामपुरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार व धर्मांतराच्या वाढत्या घटनांना आळा बसावा यासाठी आ. नितेश राणे व माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राणे म्हणाले, आमच्या समाजाच्या मुलींचे किंवा मुलांचे अपहरण झाले, तर त्याचा पोलिसांना शोध लागत नाही. दुसऱ्या समाजाच्या बाबतीत झाले, तर त्याचा पटकन शोध लागतो. मग पोलिस ठरावीक समाजाला पाठीशी घालतात की काय, असाही आरोप राणे यांनी केला. दीपकचा घातपात झाल्याचा संशय : या प्रकरणाचा तपास योग्य रीतीने सुरू आहे. सात आरोपींना अटक केली आहे. दीपकचा घातपात करून त्याला गोदावरी नदीत फेकले असल्याची कबुली आरोपींनी दिली असून त्या दिशेने गोदावरी नदीच्या दोन्हीही बाजूंनी कसून शोध घेत असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आमदार राणे यांना दिली.

दीपकच्या तक्रारीची दखल घेतली नाही
दीपक याने पोलिसांत येऊन आपल्या जिवाला धोका आहे, हे सांगितले होते. मात्र पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नाही. तक्रारीची वेळीच दखल घेतली असती, तर ही वेळ आली नसती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आरोपींना मदत केली की काय, असा संशय असून त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...