आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षण:आरक्षण उपसमितीवरून चव्हाणांची हकालपट्टी करा, आमदार मेटेंची मागणी; आज नाशकात आंदोलन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चव्हाण यांच्या हकालपट्टीसाठी नाशिक येथे रविवारी (9 ऑगस्ट) क्रांतिदिनी काळे कपडे घालून आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण महाविकास आघाडी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली जाताना दिसत नाही. तसेच आरक्षणासाठी राज्य सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे चव्हाण यांची उपसमिती अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी शनिवारी केली. मराठा समन्वय समितीची बैठक शनिवारी पुण्यात पार पडली. त्यानंतर ते बोलत होते.

.

मंत्री एकनाथ शिंदे किंवा इतर सक्षम मंत्र्याची अध्यक्षपदी नियुक्त करावी

विनायक मेटे म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचे सोंग घेत आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करावेच लागणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांना हटवावे आणि त्यांच्याऐवजी मंत्री एकनाथ शिंदे किंवा इतर सक्षम मंत्र्याची अध्यक्षपदी नियुक्त करावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली.

मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा

मुख्यमंत्री ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्या वेळी चव्हाण यांच्या हकालपट्टीसाठी नाशिक येथे रविवारी (९ ऑगस्ट) क्रांतिदिनी काळे कपडे घालून आंदोलन करणार आहोत. मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा रद्द झाल्यास पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन होईल, असे मेटे यांनी सांगितले.

0