आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेली पाच वर्षे खोळंबलेली राज्यातील शिक्षक पदभरती पुन्हा पवित्र या पोर्टलच्या माध्यमातून नव्या वर्षात होणार आहे. शिक्षकांची पदे भरताना सर्वांना समान संधी मिळावी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळावेत या उद्देशाने पवित्र पोर्टलच्या कार्यपद्धतीमध्ये बदल व सुधारणा करण्यात येणार आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुधारित पद्धतीने ‘अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी’ची (टेट) जाहिरात येणार आहे.
याआधी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एका उमेदवाराला गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा संधी उपलब्ध होती. आता उमेदवाराला प्रत्येक वेळी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराच्या त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
शिक्षक भरती पदासाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांक असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तसेच सन २०२२ मध्ये होणाऱ्या ‘टेट’ चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिल करण्यात आले आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करिता उमेदवारांनी निवडलेले माध्यम केवळ त्या चाचणी परीक्षेत राहील. निवडीसाठी परीक्षेचे माध्यम विचारात घेतले जाणार नाही. ‘टेट’नंतर पद भरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील. त्यात त्या-त्या कालावधीमध्ये आलेल्या जाहिरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल. विविध टप्प्यांमध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.