आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्याने वाद:पोलिसांनी रोषणाई काढली; मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी दिली होती फाशी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांतील दोषी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याने गुरुवारी वाद पेटला. महाविकास आघाडीच्या काळात हे सुशोभीकरण झाल्याने भाजप नेते टीका करत असून तुम्ही दहशतवाद्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या हाती का सोपवाला, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील बडा कब्रस्तानमध्ये मेमनची कबर आहे. ती मार्बल्स आणि एलईडी लाइट्स तसेच फुलांच्या पाकळ्यांनी सजवण्यात आली होती. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते. यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून एलईडी लाइट्स काढून टाकले. भाजप नेते राम कदम यांनी याकूब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हे उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने घडतेय की मुंबईप्रेमातून, असा खोचक सवाल कदम यांनी विचारला. जेव्हा याकूब मेमनला फाशी दिली व सन्मानाने त्याचे दफन झाले तेव्हा भाजपचे सरकार होते, असा प्रश्न उपस्थित करत लादेनप्रमाणे याकूबचे दफन समुद्रात का केले नाही, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपची ही नीती आहे, असे अजित पवार म्हणाले. बडा कब्रस्तानचे व्यवस्थापन पाहणाऱ्या जामा मशीद मुंबई ट्रस्टचे अध्यक्ष, शोएब खतीब यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. “याकूब मेमनने देश हिताविरोधात कृत्य केल्याने त्याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्याचा प्रश्नच नाही. जेथे मेमनची कबर आहे तिथे इतर १७ जणांच्या कबरी आहेत. तेथील माती झाड पडल्याने बाहेर येत होती, म्हणून टाइल्स लावण्यात आल्या. शबे बारातसाठी मार्च २०२२ मध्ये लायटिंग करण्यात आली होती, अशी माहिती शाेएब यांनी दिली. याप्रकरणी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

बॉम्बस्फोटात हाेता आर्थिक सहभाग 1 १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकूब मेमनला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली . 2 या बॉम्बस्फोट प्रकरणात याकूबचा भाऊ टायगर मुख्य संशयित आरोपी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात २५७ जणांनी आपला जीव गमावला होता. जवळपास १४०० हून अधिक स्फोटात जखमी झाले होते. 3 2015 मध्ये जेव्हा याकूब मेमनच्या फाशीची अंमलबजावणी केली तेव्हा राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तर केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान होते.

बातम्या आणखी आहेत...