आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी एवढा फेमस नाही..!:साडेतीन महिन्यांपूर्वीच्या आमच्या महानाट्याचे पडसाद आजही उमटत आहेत - मुख्यमंत्री शिंदे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''मी प्रशांत दामलेंएवढा फेमस नाही. साडेतीन महिन्यांपूर्वी आम्ही एक महानाट्य केले, त्याचे पडसाद आजही राज्यात, देशात अन् जगभरात उमटत आहेत, तेव्हा मी थोडा फेमस झालो होतो अशी टीप्पणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

प्रशांत दामले यांच्या एका नाटकाचे12500 प्रयोग झाले, त्या प्रयोगानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.

आमचेही महानाट्य

सीएम शिंदे म्हणाले, खऱ्या अर्थाने मलाही सर्व लोक विचारतात की, एवढे काम करता. तुमच्या नाटकाचा बारा हजार पाचशेवा प्रयोग रेकार्ड ब्रेक झाला, तसेच आम्ही तीन साडेतीन महिन्यांपूर्वी महानाट्य केले त्याचे पडसाद आजही राज्यात, देशात आणि जगभरात उमटले.

तुमच्यापेक्षा मी फेमस नाही

सीएम शिंदे म्हणाले, तुमच्यापेक्षा मी फेमस नाही, पण झालो होतो तेव्हा थोडे. प्रशांत दामलेंसारखे कलावंत ऊर्जा देणारे आहेत. मी जेव्हा लोकांमध्ये असतो तेव्हा त्यांना सांगतो की, मी तुमच्यातील आहे. साडेतीन हजार लोक होते त्यामुळे त्यांना मी भेटत भेटत आलो.

एवढी ऊर्जा कुठून येते?

सीएम शिंदे म्हणाले, एवढी एनर्जी, क्षमता आणि लोकांना कसे फेस करता असे लोक मला विचारतात. तुमच्यातही (प्रशांत दामलेंना उद्देशून) कशी ऊर्जा येते. रंगमंचावरील कलावंत जेव्हा आपली कलाकृती साकारतो, कलेचा अविष्कार घडवतो त्यावेळी समोरच्या रसिकांनी दाद दिली तरच कला अधिक वृद्धींगत होते. आमचेही असेच आहे.

फडणवीसांच्या कामाची क्षमता मोठी

सीएम शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांकडे राजकीय व्यासपीठ आज नाही. पण ते जेव्हा सीएम होते तेव्हा मी त्यांच्यासोबत काम केले. उशिरापर्यंत ते काम करीत होते. ते तत्काळ कामे करीत होते. आज आम्हीही तसेच काम करतो. करतो बघतो हे आमच्या स्वभावात नाही. राज्यात चांगले वातावरण आहे. सर्व कलावंतांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. आमच्या दोघांचे सरकार कलावंतांच्या पाठींशी उभे राहील. फिल्मसीटीतील सुविधा

चित्रनगरी उभारणार

सीएम म्हणाले, आता आमच्याकडे ठाण्यात सर्व शुटींगला येतात. ठाणे आणि मुंबईदरम्यान चित्रनगरी उभारणार आहोत. राज्याला केंद्राची साथ आहे. आपल्या राज्यासाठी सव्वा दोनशे प्रकल्पांना दोन लाख कोटींची आर्थिक मदत दिली आहे. काही असले तरीही फडणवीस वेळोवेळी जातात. लोकांसाठी आम्हाला काम करायचे आहे.

बातम्या आणखी आहेत...