आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या अडचणीत वाढ:यशवंत जाधव प्रकरणात गुन्हा नोंदवा, कॉर्पोरेट मंत्रालयाची मुंबई पोलिसांकडे पत्राद्वारे तक्रार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे मुंबईचे उपनेते तथा स्थायी समीतीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने मुंबई पोलिसांना पत्र लिहून गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दिली आहे. यामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. यासोबतच जाधावांमुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

कॉर्पोरेट मंत्रालयाने पत्रात काय लिहले?
प्रधान डिलर्ससह 6 कंपन्यांविरुद्ध कॉर्पोरेट मंत्रालयाने तक्रारकेली आहे. यामध्ये यशवंत जाधव यांचे नाव नसले, तरी यसा सर्व कंपन्या त्यांच्याशी संबंधित आहेत. असे एमसीएने सांगितले आहे. यशवंत जाधव यांच्याविरूद्ध सुरू असलेल्या तपासामध्ये स्कायलिंग कमर्शियल लिमिटेड आणि सुपरसॉफ्ट सप्लायर्स लि. या शेल कंपन्यात केलेले गैरव्यवहार समोर आले आहे. यामुळे या कंपन्याविरोधात लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. या दोन्ही शेल कंपन्या कोलकाता येथील एंट्री ऑपरेटर्सनी तयार केल्या आहेत. या कंपन्या मार्फत जाधव यांच्या कुटुंबियांना 15 कोटी असुरक्षित कर्ज दिले गेले आहे. यामुळे बहुस्तरीय व्यवहारांद्वारे लाँडरिंग केले गेल्याचे आरोप आहेत.

यशवंत जाधवांचे नेमके प्रकरण काय?
शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. यात त्यांच्याकडून काही मालमत्ता जप्त करण्यात आली होती. यशवंत जाधव स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यानी कंत्राटामध्ये कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. यशवंत जाधव यांनी चार कंत्राटदारांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती आपल्या नावावर केल्याचा आरोप आहे. ही बेनामी संपत्ती असल्याचा आयकर विभागाचा दावा आहे. आता केंद्र सरकारच्या मंत्रांलयाकडून जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता जाधवांसह शिवसेनेला मोठा फटका बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...