आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज ठाकरे यांनी 3 मे रोजी ईद असल्यामुळे भोंग्यांना हात लावणार नाही मात्र 4 मेला भोंगे काढणार असल्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांची ही भूमिका संविधान विरोधी असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्ष मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करील. पोलिसांनी सुद्धा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी ईशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील काही व्यक्ती भडकाऊ उत्तर देऊन अधिक तेढ निर्माण होईल, अशी भूमिका कोणीही घेऊ नये असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, मनसे आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या जाहीर सभा नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीसाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करीत असताना आता केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षही अॅक्टिव्ह मोड मध्ये आला आहे.
उद्य 4 मे रोजी मशिदीवरील भोंगे कोणी जबरदस्ती उतरविण्यासाठी पुढे येतील तर त्यांना रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे भीमसैनिक पुढे उभे राहतील. संविधानाचे राज्य असून इथे कुणाचे दादागिरी आम्ही चालू देणार नाही, असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. तसेच, रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आवाहनही केले आहे.
28 मेरोजी मुंबईत पक्षाचा मेळावा
येत्या 10 मे रोजी प्रमोशनमध्ये रिझर्वेशनसह 2019 च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात सर्व तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहितीही आठवले यांनी दिली. तसेच येत्या 28 मे रोजी मुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात रिपब्लिकन पक्षाचा मेळावा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.