आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यभरातील 5 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. हिवाळी अधिवेशनात मागण्या मान्य न झाल्यामुळे निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा हत्यार उगारले आहे. यामुळे राज्यभरातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार आहे. डॉक्टरांनी संपातून अतिदक्षता विभाग वगळता सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णांना फटका बसण्याची शक्यता आहे.
सकाळपासूनच डॉक्टर्स राज्यातील शासकीय व पालिका महाविद्यालयात निदर्शने करणार असल्याची माहिती निवासी डॉक्टर संघटनेकडून देण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी मार्डतर्फे संपाचा इशारा देण्यात आला असून संपाला बंधपत्रित डॉक्टरांच्या संघटनेनेही पाठींबा दर्शवला आहे.
संपाच्या वेळी अतिदक्षता विभाग वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यातज आली आहे. यामुळे मुंबईत केईएम, नायर, सायन, कूपर आणि जे जे रुग्णालयाला फटका बसण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
डॉक्टरांच्या मागण्या काय?
वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1 हजार 432 जागांची पदनिर्मिती झाली नाही. दरम्यान मागच्या काही काळापासून शासनाकडे हा प्रस्ताव धुळखात पडला आहे. शासकीय आणि महाविद्यालयात अपुऱ्या आणि मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांची मोठे नुकसान होत आहे.
यावर लवकरातलवकर निर्णय घेण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे. सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची पदेच भरली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही अपुरे पदे तातडीने भरणे तसेच मागच्या कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्टरांना महागाई भत्ता देण्यात आला नाही तो देण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे. वरीष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करत सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करण्यात यावे असे निवेदनात सांगितलं आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.