आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Resident Doctors Association Announces Nation Wide Protests Against Ramdev Baba; News And Live Updates

ॲलोपॅथीबद्दल वादग्रस्त विधान:रामदेवबाबांविरुद्ध डॉक्टरांचा रोष वाढला; निवासी डॉक्टरांच्या संघटनेची 1 जूनपासून देशभर निदर्शनांची घोषणा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने नोटीसही बजावली आहे.

ॲलोपॅथीबद्दल शंका उपस्थित करून वादग्रस्त वक्तव्य करणारे योगगुरू रामदेवबाबा यांच्याविरुद्ध देशभरातील डॉक्टरांचा संताप वाढत चालला आहे. दरम्यान, निवासी डॉक्टरांच्या संघटनेने १ जून रोजी रामदेवबाबांविरुद्ध देशभर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. या संघटनांनी आंदोलनाचा हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्याचे ठरवले असून ॲलोपॅथीच्या उपचारांबद्दल शंका उपस्थित करणाऱ्या रामदेवबाबा यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी या डॉक्टरांच्या संघटनेची मागणी आहे.

रामदेवबाबा यांनी अॅलोपॅथी उपचारपद्धतीवर प्रश्न उपस्थित करून काही शंकाही उपस्थित केल्या होत्या. कोरोनाच्या उपचारांत आतापर्यंत फक्त १० टक्के रुग्ण बरे झाले असल्याचे सांगून आयुर्वेदिक उपचारांनी ९० टक्के रुग्ण बरे झाले असल्याचा दावा रामदेवबाबांनी केला होता. अॅलोपॅथी औषधांमुळे लाखो कोरोनापीडितांनी प्राण गमावले असल्याचाही त्यांचा दावा आहे. याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने नोटीसही बजावली आहे.

बातम्या आणखी आहेत...