आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे प्रमाणेच राज ठाकरेंबद्दलही आदर आहे त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, असा पवित्रा शिंदे गटाकडून घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे जर काही बोलले तर आम्ही जसे काही बोलत नाही. तेवढेच आदरणीय राज ठाकरेंसुद्धा आहेत, त्यांच्यामुळेच शिवसेना बळकट झाली आहे. उद्धव ठाकरेंऐवढेच प्रेम बाळासाहेबांचे राज ठाकरेंवर होते. त्यामुळे राज ठाकरेंकडे ठाकरे कुटुंबीयांच्या विचाराचा वारसा आहे.
तर दुसरीकडे विरोधकांकडून 50 खोके घेतल्यांचा आरोप होत आहे. मात्र, 50 खोके सोडा 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
दीपक केसरकर म्हणाले?
उद्धव ठाकरे जर काही बोलले तर आम्ही जसे काही बोलत नाही. तेवढेच आदरणीय राज ठाकरेंसुद्धा आहेत, त्यांच्यामुळेच शिवसेना बळकट झाली आहे. उद्धव ठाकरेंऐवढेच प्रेम बाळासाहेबांचे राज ठाकरेंवर होते. त्यामुळे राज ठाकरेंकडे ठाकरे कुटुंबीयांच्या विचाराचा वारसा आहे. राज ठाकरेंनी दहीहंडीबद्दल सरकारवर टीका केली होती. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले शिवसेनेसोबत युवकांचे संघटन राज ठाकरे युवासेनेचे प्रमुख असताना आले होते. राज ठाकरे यांचे विचार बाळासाहेबांच्या विचारांसारखे आहेत. आमची पक्ष म्हणून भूमिका वेगळी असली तरी आमची खरी बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे. मात्र, राज ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार सोडून काम करत नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे बाळासाहेबांचा विचाराचा वारसा चालवत आहे, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंचे वक्तव्य काय?
लोकं जाब विचारत नाही म्हणूनच सध्या असं राजकारण सुरू आहे. नुसता खेळ मांडलाय, लोकांना गृहित धरलं जातंय. आपण काहीही केलं तरी लोकं येतील अन् मतदान करतील याची खात्री असल्यानंच हे सुरू आहे असं ठाकरे म्हणाले. अजून काही वर्षांनी लक्षात येईल की, आपला महाराष्ट्र काय होता आणि आता काय झालंय असेह ते म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते राज्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. 2019 ला मतदान करणाऱ्यांनाही आपण कुणाला मतदान केले हे आता कळत नसेल. हे राजकारण नाही. सत्तेची तात्पुरती अॅडजस्टमेंट आहे. अनेकांनी माझ्या बंडाविषयीही प्रश्न उपस्थित केला. पण माझे बंड सगळ्यांहून वेगळे होते. हे सर्वजण सत्तेसाठी शिवसेनेतून बाहेर पडले. मी बाळासाहेबांना सांगून पक्ष सोडला,' असे राज ठाकरे म्हणाले
राज ठाकरेंनी यावेळी गोविंदांना सरकारी नोकऱ्यांत दिलेल्या आरक्षणावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले -'आताच्या सरकारने गोविंदांना सरकारी नोकऱ्यांत 5 टक्के आरक्षण दिले आहे. मग आता राजकारणालाही खेळाचा दर्जा द्या. कोजागिरीला, मंगळागौरीलाही खेळाचा दर्जा द्या. मतदार अशा गोष्टींकडे गांभिर्याने पाहत नसल्यामुळे हे लोक असे निर्णय घेतात,' असे राज म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.