आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:काेर्टाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्ष परीक्षांचा निर्णय, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंत्री सामंत यांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील

सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. परीक्षेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या वेळी बोलत होते. सर्व अकृषी विद्यापीठांना प्रत्यक्ष भेट देऊन कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेत परीक्षेचे नियोजन करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांच्याशीसुद्धा याबद्दल सविस्तरपणे चर्चा करून विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांचे कसलेही खच्चीकरण होणार नाही, आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन राज्य शासन निर्णय घेईल, असेही सामंत यांनी संगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो.
सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव, विद्यार्थी, पालक यांची मानसिकता, कुलगुरू यांच्या सूचना आणि काही शैक्षणिक संघटनांचे निवेदन अशा सर्वांगीण परिस्थितीचा विचार करूनच परीक्षेसंदर्भात बाजू मांडण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच या वर्षापासून उच्च न्यायालयाने आदेशित केल्याप्रमाणे सीजीपीए पद्धतीने निकाल जाहीर करून पदवी देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांचे हित, त्यांची मानसिक स्थिती आणि राज्यातील कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव याच पार्श्वभूमीवर घेतला होता.

मंत्री सामंत यांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील
अधिकार नसताना आघाडी सरकारने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळले असून विद्यार्थ्यांना झालेल्या भयानक मानसिक त्रासाबद्दल उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली.