आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Responsibility To Cooperate With The Organization Of The Government, Central Government Should Not Allow Injustice To Anyone; We Will Raise Our Voice In Lok Sabha Supriya Sule

तपासयंत्रणांना सहकार्य करणे ही जबाबदारी:केंद्राने कुणावरही अन्याय करु नये; मी लोकसभेत आवाज उठवणार - सुप्रिया सुळे

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारच्या संस्थेला सहकार्य करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. संजय राऊत त्यांना सहकार्य करतील हा विश्वास आम्हाला आहे. सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास होत आहे, याविरोधात आम्ही लोकसभेत आवाज उठवणार आहोत असेही सुळेंनी सांगितले. तर केंद्र सरकारने कुणावर अन्याय होणार नाही यांची खबरदारी केंद्र सरकारने घ्यायला हवी. आम्ही तपास यंत्रणांना सहकार्य करू, काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना तसे केले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्याची संस्कृती नाही

राज्यात विचाराचे विरोधक होते, कुणी ऐकमेकांवर वयक्तिक टीका केली नाही, अशी टीका करणे खूप दुर्देवी शरद पवारांवर गेली 55 वर्षे टीका होती आहे, मात्र, त्यांनी कधीच विरोधकांना अन् टीकाकारांना प्रतिउत्तर दिले नाही. मराठी आणि भारतीय संस्कृती पवारांनी जपली आहे, आम्ही पक्ष म्हणून तो जपण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांचा विचार आहे. अनेकांच़े व्हिडीओ आले, मात्र आम्ही विचारांच्या वारश्यावर आहोत कुणाचा वयक्तिक नाराजी नाही. काँग्रेसकडूनही हे पाळले जाते असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.

वैयक्तिक विरोध राजकारणात अयोग्य
वैयक्तिक विरोध करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला अन् राजकारणाला शोभत नाही असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. तर कुणी काय बोलावे हे मी सांगू शकत नाही, आणि रोखू शकत नाही असे सांगताना सुप्रिया सुळेंनी राऊतांवर टीका करणाऱ्यांवर टीका केली आहे. कुणाला अटक व्हावी, असे मी कधीच बोलणार नाही, असे म्हणतानाच भाजप विरोधात काल तयार झालेले वातावरण तसे राहू नये यासाठीही ही कारवाई असू शकते असे मतही सुळेंनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...