आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अनलॉक 3.0:माॅल्स, शाॅपिंग काॅम्प्लेक्ससह रेस्तराँचे स्वयंपाकगृह उघडणार; मिशन बिगिन अगेनचा राज्याचा पाचवा टप्पा जाहीर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंतरजिल्हा एसटी सेवेला संमती मिळण्याची शक्यता
  • केंद्र सरकारचे अनलॉक-3 : रात्रीची संचारबंदी उठवली

केंद्र सरकारने अनलॉक-३ च्या मार्गदर्शक सूचना बुधवारी रात्री जारी केल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊनसंदर्भातल्या सूचना जारी केल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला. मात्र माॅल्स, शॉपिंग काॅम्प्लेक्स तसेच फूड कोर्टचे किचन आणि आऊटडोअर खेळांना परवानगी देण्यात आली आहे.

१. पालिका क्षेत्र : नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स ५ ऑगस्टपासून सुरू होतील. सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेदरम्यान अशी त्यांची वेळ राहील. मॉल्समधील थिएटर मात्र सुरू होणार नाहीत. मॉलमधील रेस्तराँचे स्वयंपाकगृह खुले राहील. येथून फक्त घरपोच जेवण दिले जाऊ शकेल.

२. खेळ : आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज, व्यायामशाळा, टेनिस, बॅडमिंटन आणि मल्लखांब यांना ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. या वेळी सामाजिक अंतर आणि निर्जंतुकीकरण अनिवार्य असणार आहे. पोहण्याचे तलाव सुरू करण्यास मात्र परवानगी नाही.

३. वाहतूक : दुचाकीवर आता दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांना हेल्मेट आणि मास्क बंधनकारक आहे. टॅक्सी, कॅबमध्ये १+३, रिक्षामध्ये १+२, चारचाकीमध्ये १+३ अशी परवानगी आहे. प्रवाशांना मास्क अनिवार्य.

४. लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत पाचव्या टप्प्याचा लॉकडाऊन ३१ आॅगस्ट मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहे. माॅल्स, फूड कोर्ट आणि शाॅपिंग काॅम्प्लेक्ससंदर्भातली नियमावली स्थानिक स्वराज्य संस्था बनवू शकणार आहेत.

आंतरजिल्हा एसटी सेवेला संमती मिळण्याची शक्यता

आंतरजिल्हा एसटीला परवानगी मिळेल, अशी सर्वांची अटकळ होती. मात्र या टप्प्यात ती देण्यात आली नाही. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमान्यांसाठी आंतरजिल्हा एसटी सेवेला संमती दिली जाऊ शकते.

केंद्र सरकारचे अनलॉक-३ : रात्रीची संचारबंदी उठवली

देशातील अनलॉक-३ ला शनिवार, दि. १ ऑगस्टपासून सुरुवात होईल. यासाठी केंद्र सरकारने बुधवारी दिशानिर्देश जाहीर केले. याअंतर्गत ५ ऑगस्टपासून जिम आणि योग केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रात्रीची संचारबंदीही उठवण्यात आली आहे. देशभरातील महाविद्यालये,शाळा आणि मेट्रो रेल्वे सेवा बंदच ठेवण्यात आल्या आहेत.

फिजिकल डिस्टन्सिंगसह साजरा करता येईल स्वातंत्र्य दिन

> फिजिकल डिस्टन्सिंगसह साजरा करता येईल स्वातंत्र्य दिन

> वंदे भारत मिशनमध्ये मर्यादित रूपात आंतरराष्ट्रीय विमान प्रवास होईल

> राष्ट्र‌ीय, राज्य, जिल्हा, उपविभागीय, नगरपालिका, पंचायत पातळीवर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरा करता येईल.